सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. शिवाय कधी कधी असे व्हिडीओ किंवा घटना व्हायरल होतात, जे पाहून आपण डोक्याला हात लावतो. सध्या उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील येथील अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सरकारी हातपंपातून पाण्याऐवजी वेगळाच द्रव पदार्थ बाहेर येत असल्याचं दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पंपातून बाहेर येणारा द्रव पदार्थ दूध असल्याची अफवा पसरताच लोकांनी ते नेण्यासाठी मोठी गर्दी केल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मुरादाबादच्या बिलारी पोलीस स्टेशन परिसरातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सरकारी हातपंपातून पांढऱ्या रंगाचे द्रव बाहेर पडताना दिसत आहे. जे दूध समजून लोकांनी घरी न्यायला सुरुवात केली. शिवाय बाहेर येणारे दुधासारखे द्रव अनेकजण बाटलीमध्ये किंवा मिळेल त्या भांड्यात भरताना दिसत आहेत. कोणी ते द्रव प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येही भरत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे काही लोकांनी तर मागचा पुढचा कसलाही विचार न करता आणि पंपातून बाहेर येणारा द्रव पदार्थ काय आहे, याबाबतची माहिती जाणून न घेताच ते प्यायला सुरुवात केली.

हेही पाहा- झुडपात लपलेल्या महाकाय अजगराचे लहान मुलानं पकडलं तोंड अन् पुढच्याच क्षणी….; पाहा अंगावर काटा आणणारा VIDEO

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. मात्र, दुधासारखा दिसणारा हा पदार्थ कोणता आहे हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचंही सांगण्यात येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. एका युजरने लिहिलं, “आपल्या देशातील लोक खूप विचित्र आहेत.” तर दुसऱ्याने लिहिलं, “हे पाणी प्यायल्यानंतर त्यांचे आरोग्य सुधारेल अशी आशा आहे.” तर तिसऱ्या एकाने लिहिलं, “मूर्खपणाची हद्द झाली.”