Viral Video: आजकाल सोशल मीडियावर खाद्यपदार्थांशी संबंधित फसवणुकीच्या किंवा मजेशीर व्हिडीओंचा अक्षरशः पाऊस पडतो. कधी कोणी पिझ्झा मागवतो, तर हातात भजी येते; तर कधी मोमोऐवजी समोसा येतो. पण, याहूनही मजेदार प्रकार घडला आहे उत्तर प्रदेशमधील मिर्झापूरमध्ये.
मदर्स डे साठी प्रज्ञा नावाच्या एका मुलीने खास करून चीज केक ऑर्डर केला. तिला वाटलं की सुंदर, मऊ व चविष्ट चीज केक मिळेल. पण जेव्हा तिने डबा उघडला तेव्हा धक्का बसला – आत होता एक साधा क्रीम केक आणि त्याच्या वर कापलेल्या चीजच्या स्लाइसेस नीट रचून ठेवलेल्या.
प्रज्ञाने हा अनुभव इन्स्टाग्रामवर एका रीलमध्ये शेअर केला आहे, ज्याची कॅप्शन आहे – “मिर्झापूरमध्ये कधीही चीज केक ट्राय करू नका.” व्हिडीओमध्ये ती केक उघडताना दिसते आणि कॅमेऱ्याकडे पाहून म्हणते – “भाई, मिर्झापूर नवशिक्यांसाठी नाही.”
पाहा व्हिडिओ
ती म्हणते, “त्यांनी मला तुटलेला-फुटलेला केक पाठवला, जो निश्चितच चीज केक नाही आणि वर चीजचे स्लाइस ठेवून चीज केक बनवला!”
केक थोडा दाबलेला होता, कुठल्याही साज-सजावटीशिवाय आणि वर चार चीज स्लाइस ठेवले होते – जणू काही कोणीतरी घाईघाईने ‘चीज केक’ बनवण्याचा फॉर्म्युला शोधला आहे – “केक + चीज = चीज केक!
रागावण्याऐवजी प्रज्ञाने संपूर्ण घटनेवर एक अतिशय मजेदार प्रतिक्रिया दिली – “मला ही व्यवसाय कल्पना आधी का सुचली नाही? ५० रुपयांना केक, १० रुपयांना चीज आणि ८०० रुपयांना विकून टाका!” ती पुढे म्हणाली, “आता मला समजले की, लोक मिर्झापूरला का घाबरतात!”
या व्हिडीओखाली अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. एका कमेंटमध्ये लिहिले होते, “छान आहे; तुम्ही बफेलो विंग्स का ऑर्डर केले नाहीत?” दुसऱ्याने म्हटले, “आणि हॉट डॉग्स का नाही?” काहींनी तर हसून लिहिले, “जर लेमन चीज केक घेतला असता, तर वरून लिंबाचा रस पिळून दिला असता.”