Model Girl Kiss Snake Video : हल्ली लोक रिल, युट्यूब व्हिडीओच्या नादात वाट्टेल त्या थराला जाण्यात तयार असतात. प्रसंगी नसते धाडस करतात. हे धाडस काहीवेळा जीवावर बेतू शकते याचीही विचार ते करत नाहीत. यात हल्ली धोकादायक प्राण्यांबरोबर रील बनवण्याचा एक धक्कादायक ट्रेंड दिसून येतो. यातही सापाबरोबर व्हिडीओ बनवणाऱ्यांची संख्या अधिक आहे. अशाप्रकारे सापाबरोबर व्हिडीओ बनवताना दंश केल्यास मृत्यूचा धोका असतो पण तरीही लोक नसते धाडस करतात. सध्या अशाच एका मॉडेल तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. ज्यात ती चक्क एका जिवंत सापाला लिप किस करताना दिसतेय. हे दृश्य पाहून तुमच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

जगात असे अनेक लोक आहेत जे सापाबरोबर खतरनाक स्टंटबाजी करताना दिसतात. ही स्टंटबाजी जीवावर बेतेल याचाही विचार ते करत नाहीत. व्हायरल व्हिडीओत तुम्हाला हेच दृश्य पाहायला मिळेल. व्हिडीओत पाहू शकता की, एक मॉडेल तरुणी एका स्टुडिओमध्ये सापाबरोबर अनोखे फोटोशूट करतेय. या फोटोशूटच्यादरम्यान ती सापाला चक्क लिप किस करतेय. ज्या सापाला आपण हातात पकडताना घाबरतो त्या सापाला तिने चक्क ओठांपर्यंत नेऊन लिप किस केली, यावेळी तिच्या चेहऱ्यावर अजिबात भीती दिसत नव्हती. ना कपाळावर अट्य होत्या, अगदी आत्मविश्वासाने तिने सापाबरोबरचं ते फोटो शूट पूर्ण केलं.

व्हिडीओमध्ये मॉडेल तरुणी कोणत्यातरी स्टुडिओत उभी असल्याचे दिसतेय. यावेळी तिने सुंदर असा गाऊन परिधान केलाय. चेहऱ्यावर एकमद लाइट मेकअप आणि गळ्यात ज्वेलरी असा गेटअप तिने केलाय. यावेळी दोन हातांनी सापाला पकडून ती लिप किस करतेय. पाहताना असं वाटतं की कोणत्याही क्षणी साप तिच्यावर हल्ला करु शकतो. पण तसं काही होत नाही सापही अगदी शांतपणे तिच्या ओठांजवळ जातो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सापाबरोबरच्या फोटोशूटचा हा धक्कादायक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘lauraisabelaleon’ नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. जो लाखो लोकांनी पाहिला तर हजारो लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. काहींनी म्हटले की, सापाबरोबर असं कोण करतं? तर काहींनी म्हटले की, छंद ही मोठी गोष्ट आहे.