Monkey funny video Viral: माकड हे माणसाच्या हुबेहुब नकला करतं ही गोष्ट आतापर्यंत ऐकली असेल. पण माकडही माणसासारखं हुशार असतं हे अनेक कथांमधून किंवा अनुभवांमधून समोर येतं. होळीच्या दिवशी वृंदावनात जाणे हे अनेकांचे स्वप्न असते. त्यामुळेच दरवर्षी लाखो लोक होळी साजरी करण्यासाठी येतात. मात्र, एका व्यक्तीला होळी साजरी करण्यासाठी वृंदावनात जाणे चांगलेच महागात पडले आहे. वृंदावनमध्ये एका माकडाने एका व्यक्तीकडून त्याचा Samsung S25 Ultra दीड लाख रुपयांचा फोन हिसकावून घेतला आणि एका उंच ठिकाणावर जाऊन बसला. फोन हिसकावल्यानंतर तो माणूस बेचैन झाला. मात्र पुढच्याच त्याने असं डोकं लावलं की क्षणात माकडानं त्याचा फोन परत केला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

माकडाचा फोन परत मिळवण्यासाठी एका माणसाने केलेल्या जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, माकड बाल्कनीत एक महागडा फोन घेऊन बसलेले दिसत आहे. खाली असलेले तीन लोक ते परत मिळविण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहेत. ते त्याच्याकडे अनेक फळांचे गठ्ठे फेकतात, पण माकड त्यांच्याकडे लक्ष देत नाही. अखेर, ते माकडाकडे फ्रूटीचा बॉक्स फेकतात तेव्हा माकड फ्रूटी पॅकेट पकडतो आणि फोन परत फेकतो. पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सॅमसंग एस25 अल्ट्रा वृंदावनच्या माकडाने पळवून नेले.” माकडाच्या कुशाग्र बुद्धिमत्तेने सोशल मीडिया यूजर्स हैराण झाले आहेत.

हा व्हिडीओ खूप मजेशीर असून तो पाहिल्यानंतर अनेकजण त्यावर विविध प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. माकडाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. त्यामुळे आजकाल माकडदेखील योग्य डिल करत असल्याचं काही नेटकरी म्हणत आहेत.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Modern monk ? (@kartik_rathoud_134)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ kartik_rathoud_134 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने व्हिडिओवर खिल्ली उडवली, “माकड पक्का हुशार आहे.” तर दुसरा म्हणाला, “माकडाला वस्तु विनिमय प्रणाली माहित आहे.” तर, तिसऱ्या वापरकर्त्याने म्हटले, “हा मानवी इतिहासातील सर्वात वेगवान व्यापार होता.”त्याच वेळी, एका वापरकर्त्याने सांगितले की, “वृंदावनमध्ये हे एक सामान्य दृश्य आहे. “हे इथे अनेकदा घडते.” या माकडाला वस्तुविनिमय प्रणाली आपल्यापेक्षा चांगली समजते असे दिसते.