मातृत्वाला कलंक लावणारा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की एक संतप्त आईने आपल्या मुलाला मारहाण करक आहे. जो किरकोळ कारणावरून मुलाबरोबर क्रूरतेने वागणाऱ्या आईचा व्हिडिओ समोर आला आहे. कुटुंबातील एका सदस्याने ही भयानक घटना कॅमेऱ्यात कैद केली आहे व्हिडीओमध्ये त्या मुलाची आई त्याला भांड्यांनी मारहाण करते, रडत असताना त्याला लाथ मारते आणि त्याला जीवे मारण्याची धमकी देते. व्हिडिओमधील कोणाचीही ओळख अद्याप पटलेली नाही. पोस्टमध्ये दाखवले आहे की,”हे फुटेज राजस्थानच्या करौली येथील आहे.
आई आणि मुलाचे नाते बहुतेकदा सर्वात सुंदर नात्यांपैकी एक मानले जाते. परंतु एका व्हायरल व्हिडिओमध्ये उलट परिस्थिती दाखवली आहे, जिथे एक संतप्त आई तिच्या मुलाला किरकोळ कारणावरून भांड्यांनी क्रूरपणे मारहाण करत आहे. व्हिडिओमध्ये एका क्षणी, आई एका कोपऱ्यात असहाय्यपणे रडत असताना त्याला लाथा मारताना दिसत आहे. दुसऱ्या क्लिपमध्ये, ती महिला अत्यंत रागाच्या भरात तिच्या पतीला धमकावताना दिसत आहे. दरम्यान, व्हिडिओ रेकॉर्ड करणारा एक पुरूष, कदाचित कुटुंबातील एक सदस्य तिला विरोध करत असेल, तेव्हा ती स्वतःला तिचा मुलगा असल्याचे सांग ती त्यांच्याबरोबर काहीही करू शकते असे सांगत आहे.
नेमके काय घडले?
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, मुलगा टेबलाखालून चमचा उचलायला विसरतो आणि तेव्हा आई हातात भांडी घेऊन त्याला मारू लागते. मुलगा ‘सॉरी’ म्हणाला पण ती त्याला मारतच राहिली. दुसऱ्या क्लिपमध्ये, खोलीच्या कोपऱ्यात रडत असताना ती तिच्या मुलाला लाथ मारताना आणि ओरडताना दिसत आहे.
नंतर दुसऱ्या क्लिपमध्ये, ती महिला तिच्या पतीशी काही वादावरून भांडतानाही दिसत आहे. ती तिच्या पतीला शिवीगाळ करत आहे आणि धमकावत आहे. शेवटच्या क्लिपमध्ये, व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या एका पुरूषाने तिच्या मुलाला मारहाण केल्याबद्दल महिलेला विरोध केला तेव्हा ती स्वतःचे समर्थन करत राहिली आणि म्हणाली, “मेरी इच्छा हुई तो मैं मेरे बच्चे को मार भी दुंगी (मला वाटले तर मी त्याला मारून टाकेन).”
एक्सवर @harshasija8 नावाच्या पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “राजस्थानमधील करौली येथे पती आणि मुलांवर अत्याचार केल्याची ही घटना आहे. कृपया या प्रकरणाची चौकशी करा आणि कारवाई करा.”
व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहले की, “कोपऱ्यात घाबरून लपून बसलेल्या तुमच्या स्वतःच्या मुलाला लाथ मारण्यासाठी तुम्ही किती राक्षसी असाल याची कल्पना करा!! तिला काही आठवड्यांसाठी जेलमध्ये ठेवा आणि मुलाला जाणवणाऱ्या दुर्बेलतेची जाणीव तिलाही होऊ द्या.”
दुसऱ्याने उपहासात्मक टिका केली, स्त्रीवादी कधी येतील याची वाट पाहत आहे “अरे, तिचा दिवस नक्कीच कठीण गेला असेल. तिला या पातळीला ढकलल्याबद्दल पतीला दोषी ठरवायला हवे. ती देखील माणूस आहे”