सोशल मीडियावर आपल्यासमोर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी काही व्हिडीओ हे प्राणी किंवा वाईल्ड व्हिडीओशी संबंधित असतात. तर, काही व्हिडीओ आश्चर्यचकित करणारे असतात. वेगवेगळ्या प्राणीसंग्रहालयांमधल्या प्राण्यांचे चित्रविचित्र, कधी धक्कादायक, विनोदी व्हिडीओज सतत व्हायरल होत असतात. त्यांचा मनसोक्त आनंदसुद्धा लोक घेतात. पण, काही व्हिडीओज खरंच विचारात पाडतात आणि निसर्गाच्या आश्चर्यांवर विचार करायला लावतात.

अनेकदा सोशल मीडियावर जंगलात राहणाऱ्या धोकादायक प्राण्यांचे विविध प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतात. जर तुम्हाला वन्यजीवांमध्ये रस असेल तर तुम्हाला हे व्हिडीओ नक्कीच आवडतील. प्राणी जग अद्वितीय आहे आणि कधीकधी आपल्याला आश्चर्यचकित करते. उत्तराखंडमधील लोकप्रिय जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये असेच दृश्य पाहायला मिळाले. जंगलातील शिकारी प्राणी नेहमीच शिकारीसाठी तयार असतात. ते कुठे, कधी आणि कसा हल्ला करतील याचा काही नेम नाही. विशेषतः वाघ, सिंह आणि बिबट्यासारखे प्राणी तर आपली शिकार हातातून जाऊच देत नाहीत. ते यामध्ये पटाईत असतात आणि अत्यंत कुशलतेनं दुसऱ्या प्राण्याची शिकार करतात. परंतु, नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तुम्हाला वेगळंच चित्र पाहायला मिळणार आहे.

Shocking video 9 year old girl going to school was attacked by a pitbull dog
VIDEO: भयंकर! चिमुकला अंगणात खेळत होता; इतक्यात पिटबुल कुत्रा आला अन्..आधी हल्ला, मग ओढून नेलं
stray dogs at least five dog attack on kid cctv footage video viral on social media
VIDEO: भयंकर! घाबरून पळणार इतक्यात जमिनीवर पाडलं अन्…; चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला
Mercedes Crashed Kachori Shop Video
भरधाव कार कचोरीच्या दुकानाला धडकली; ६ जण जखमी, Video मध्ये ‘त्या’ पतीची घालमेल पाहून नेटकरी भावुक
Veg Tawa Fry Bhaji Recipe In Marathi
हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत व्हेज तवा फ्राय भाजी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

(हे ही वाचा : नागपूरच्या डॉली चहावाल्याचा आता नवा व्हायरल फोटो तुम्ही पाहिलात का? यात तर चक्क… फोटो पाहून तुम्हालाही बसेल धक्का )

आयएएस संजय कुमार यांनी एक्स जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचा एक चांगला व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एका वाघाने हरणाचे बाळ प्रेमाने तोंडात धरले आहे आणि ते काळजीपूर्वक घेऊन जात आहे. सहसा वन्यप्राण्यांना त्यांचे भक्ष्य सापडताच ते प्रथम त्याला मारतात आणि नंतर ते त्यांचे खाद्य बनवतात. पण, वाघिणीने जिवंत हरणाच्या बछड्याला जबड्यात पकडले आहे आणि यामागचे कारणही खूप रंजक आहे.

येथे पाहा व्हिडिओ

वास्तविक, ही मादी वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या पिल्लांना शिकार केल्यानंतर मारण्याची प्रक्रिया शिकवण्यासाठी जिवंत हरणाच्या बछड्याला घेऊन जात आहे. व्हिडीओ शेअर करताना संजय कुमार यांनी लिहिले आहे, “कॉर्बेट टीआरच्या ढिकाला झोनमध्ये जंगलाचा एक अद्भुत क्षण कैद झाला! वाघीण आपल्या तीन महिन्यांच्या भुकेल्या शावकांना अंतिम शिकारीसाठी प्रशिक्षित करण्यासाठी जिवंत हरणाच्या पिल्लाला घेऊन जात आहे.”