जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग IPL च्या पुढील सीजनसाठी मंगळवारी (१९ डिसेंबर) दुबईमध्ये मिनी लिलाव आयोजित करण्यात आला होता. या लिलावासाठी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस. धोनी आणि दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतही दुबईला पोहोचले आहेत. लिलावानंतर दोन्ही विकेटकिपर बॅटसमन टेनिस कोर्टवर उतरले होते. दोन्ही खेळाडूंमधील या टेनिस सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धोनी आणि ऋषभ एकत्र टेनिस खेळताना दिसत आहेत

दोन्ही स्टार्स क्रिकेटपटू टेनिस खेळताना दिसले

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एम. एस. धोनी आणि ऋषभ पंत यांच्यात टेनिस कोर्टवर जोरदार लढत पाहायला मिळत आहे. यादरम्यान ऋषभची खेळी पाहून धोनी आश्चर्यचकित होताना दिसत आहे. तर कोर्टवर उपस्थित असलेले चाहतेही दोन्ही खेळाडूंच्या या सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. याशिवाय त्याच्या प्रत्येक शार्ट मारल्यानंतर चाहतेही उत्साहात जल्लोष करत आहे. दोन्ही भारतीय स्टार्सना बऱ्याच काळानंतर एकत्र पाहिल्यानंतर चाहतेही सोशल मीडियावर खूप आनंदी दिसत आहेत.

हेही वाचा – पाण्याशिवाय अंडी कशी उकडवावी? गावाकडे वापरली जाणारी हटके पद्धत एकदा पाहाच, व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या

हा व्हिडिओ पाहून @CricCrazyJohns नावाच्या युजरने एक्स(ट्विटर)वर पोस्च आहे. त्याने एमएस धोनीचे कौतुक करत लिहिले की, “अशी कोणती गोष्ट आहे जी एमएस धोनी करू शकत नाही?” तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, “धोनी यातही कप जिंकू शकतो.” आणखी एका यूजरने लिहिले की, “या दोन खेळाडूंना क्रिकेटच्या मैदानावर पाहण्यासाठी आयपीएलची वाट पाहत आहोत.” याशिवाय एका यूजरने लिहिले की, “दोन्ही खेळाडू तंदुरुस्त दिसत आहेत आणि आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी तयार आहेत.”

हेही वाचा – धावत्या ट्रकमध्ये चोरट्यांनी केली चोरी, तेही बाईकवर उभे राहून; कॅमेऱ्यात कैद झाली घटना, व्हायरल होतोय व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिलावासाठी दोन्ही खेळाडू दुबईला पोहोचले होते

महेंद्रसिंग धोनी आणि ऋषभ पंत बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहेत. मात्र या मिनी लिलावासाठी दोन्ही खेळाडू आपापल्या संघासह दुबईला पोहोचले होते. यावेळी दिल्ली कॅपिटल्सच्या लिलावाच्या टेबलवर ऋषभ पंतही दिसला. तर कॅप्टन कूल धोनी व्हिडिओ कॉलद्वारे लिलावामध्ये सहभागी झाला होता. मात्र लिलाव संपल्यानंतर दोन्ही खेळाडू टेनिस कोर्टवर नक्कीच भेटले.