MS Dhonis Hilarious Speech At Rishabh Pants Sisters Engagement : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सर्वांत यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. चाहते त्याला प्रेमाने कॅप्टन कूल, माही अशा अनेक नावांनी ओळखतात. धोनी सोशल मीडियापासून काही प्रमाणात दूर राहणे पसंत करीत असला तरी त्याची प्रसिद्धी मात्र तिळमात्र कमी झालेली नाही. आज केवळ भारतातच नाही, तर जगभरात त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे नेहमी तो कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. अशात कॅप्टन कूल धोनी आता भारताचा स्टार यष्टिरक्षक ऋषभ पंत याच्या बहिणीच्या साखरपुड्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.

अलीकडेट ऋषभ पंतची बहीण साक्षी पंतचा साखरपुडा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. ऋषभने बहीण साक्षीसोबतचे फोटो स्वत: सोशल मीडियावर शेअर करून ही माहिती दिली. या कार्यक्रमासाठी धोनीची खास हजेरी पाहायला मिळाली. यादरम्यान धोनीने जोडप्याला हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
salman khan firing accused Sagar pal father reaction
सलमान खानच्या घरावर गोळ्या झाडणाऱ्या आरोपीच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “तो खूप…”
Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवताना ‘ही’ चूक पडू शकते महागात! पाहा अपघाताचा लाइव्ह VIDEO

साक्षी पंत आणि अंकित चौधरी यांना शुभेच्छा देण्यासाठी धोनी स्टेजवर पोहोचला. यावेळी जोडप्याला हटके शुभेच्छा देत धोनीने म्हटले की, हे दोघं खूप आनंदी दिसत आहेत, उत्साहीही आहेत. त्यांनी चांगला डान्सही केला; जो मला आवडला. त्यांची जोडी चांगली जमली आहे. मी त्यांना पुढील आव्हानात्मक काळासाठी खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो. अर्थात, करिअरच्या दृष्टिकोनातून बोलत आहे. यावेळी धोनीने आव्हानात्मक शब्द उच्चारताच उपस्थित पाहुणेही जोरजोरात हसू लागले.

ऋषभ पंतची बहीण साक्षी पंत लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दरम्यान, भाऊ रिषभने साक्षी आणि तिचा भावी पती अंकित चौधरी यांच्या साखरपुड्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोत साक्षी एंगेजमेंट रिंग दाखवताना; तर दुसऱ्या फोटोत केक कटिंग करताना दिसतेय. दरम्यान, साक्षीनेही तिच्या आयुष्यातील या आनंदी क्षणाचे फोटो शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले की, हा आमच्या प्रेमकथेचा पुढचा अध्याय आहे.

दरम्यान, अंकित चौधरी आणि साक्षी पंत जवळपास नऊ वर्षांपासून एकमेकांना डेट करीत होते. यादरम्यान दोघांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अंकित चौधरी इंग्लंडमध्ये वास्तव्यास असतो. तो एलिट आयटीयू नावाच्या कंपनीच्या संचालक मंडळावर आहे. ही कंपनी शिक्षण आणि पर्यावरणासाठी अनेक वर्षांपासून काम करीत आहे.