भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे जगभरात लाखो चाहते आहे. चाहते नेहमी धोनीवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. आता धोनीच्या एका चाहत्याने चक्क रक्ताने पत्र लिहिले आहे आणि एक खास मागणी केली आहे. सध्या हे प्रकरण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.
चाहत्याने रक्ताने लिहिले पत्र
धोनीचे चाहते नेहमी त्याच्यासाठी स्पेशल गोष्टी करत असतात. आयपीएल सुरू असतानाही चाहते सातत्याने सोशल मीडियावर धोनीविषयी आपले प्रेम व्यक्त करत होते. आता तर एका चाहत्याने कहर केला आहे. चक्क धोनीला रक्ताने पत्र लिहिले आहे. या पत्रात त्याने धोनीला आमंत्रण पाठविले आहे. या चाहत्याने पत्रात लिहिले आहे, ” आय लव्ह यू माही, तुला भीलवाडा येथे आयोजित टूर्नामेंट कार्यक्रमाला यायचे आहे.”
हेही वाचा : अस्वलाच्या अवतारात शेतात फिरतोय शेतकरी, कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल
पत्र लिहिणाऱ्या या चाहत्याचे नाव विजेश कुमार आहे. विजेश लहानपणापासून धोनीचा फॅन आहे. लहानपणापासून त्याने धोनीला खेळताना पाहिले आहे.
येत्या ७ जुलै ला धोनीचा वाढदिवस आहे. या वाढदिवशी विजेशला धोनीसाठी काही खास करायचं आहे, त्यामुळे विजेशने भीलवाडा येथे धोनीच्या वाढदिवसानिमित्त टूर्नामेंटचे आयोजन केले आहे. या टूर्नामेंटचे नाव हॅप्पी बर्थडे वर्ल्ड कप ठेवले आहे.
धोनीच्या या चाहत्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. धोनी या चाहत्याची ही खास मागणी पूर्ण करणार का आणि या टूर्नामेंटमध्ये हजेरी लावणार का, या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.