चेन्नईच्या सुपरकिंग्जने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यांचे वय १०३ वर्ष असून नाव रामदास असे आहे. ते चेन्नईमध्ये राहतात. एमएस धोनीने त्यांना खास भेट दिली आहे. रामदास यांनी ब्रिटीश सैन्यामध्ये काम केले आहे आणि विद्यार्थी असताना क्रिकेट देखील खेळत असे. हा व्हिडीओमध्ये रामदास याने सीएसके आणि धोनीकरिता आपले प्रेम व्यक्त केले आहे. विशेष गोष्ट म्हणजे ते रामदास स्वत:ला वृद्घ मानत नाही. ते स्वत:ला वयस्कर तरुण म्हणतात.

आयपीएलमुळे वाढले क्रिकेटची क्रेझ


महेंद्रसिंग धोनीने त्याच्यासाठी खास टी-शर्टवर स्वाक्षरी केली आहे. यावर धोनीने लिहिले आहे, ‘थँक्स थाता, तुमच्या समर्थनासाठी.’ याच्या खाली धोनीने सही केली आहे. व्हिडिओमध्ये रामदासचा मुलगा सांगतो की,”तो आधीपासूनच क्रिकेटचा चाहता होता. आयपीएल सुरू झाल्यानंतर त्याची क्रिकेचसाठीचे वेड क्रेझ आणखीनच वाढली.”

रामदास सांगतात की, त्यांना क्रिकेटमध्ये फलंदाजीची भीती वाटत होती. त्यामुळे त्याला गोलंदाजीची आवड होती. मैदानावर क्रिकेट खेळण्याऐवजी ते टीव्हीवर पाहत असताना, रामदास या व्हिडिओमध्ये धोनीची झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक होत आहेत. तो मोबाईलवर रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना सहज ओळखू शकतात.

हेही वाचा – माकडाचा राजेशाही थाट! टेबल खुर्चीवर बसून ताटात जेवणाऱ्या माकडाचा Video Viral

मॅच सुरु होताच टीव्हीवर जातात

रामदास यांच्या मुलाने सांगितले की,”म्हातारपणामुळे त्यांना जास्त वेळ बसू दिले जात नाही. असे असूनही मॅचचा आवाज ऐकताच तो टीव्हीकडे जातात. या व्हिडिओमध्ये जेव्हा रामदासचा मुलगा त्याला विचारतो की, दिल्लीत चेन्नई सुपर किंग्जचा सामना आहे. धोनीला भेटायला जाणार का? याला प्रत्युत्तर देताना रामदास खूप उत्तेजित होत असे.

हेही वाचा – “त्याने माझ्या प्रायव्हेट पार्टला…” Delhi Metro १६ वर्षाच्या मुलाबरोबर घडला भयानक प्रसंग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रामदास यावर्षी १०४ वर्षांचे होतील. या वयातही त्यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. त्याच्या संभाषणावरून तो टी-२० क्रिकेटचा चाहता असल्याचं दिसत होतं. २० षटकांचे सामने लवकर संपतात. हे फार काळ टिकत नाहीत. म्हणूनच मला ते आवडतात असेही ते यावेळी सांगतात.