scorecardresearch

Premium

कॅप्टन कूल धोनीची Mercedes G Class मधून सवारी; नंबर प्लेट पाहून चाहतेही चकित; पाहा Video

धोनी मर्सिडीज बेंझ जी क्लास (Mercedes Benz G Class)मधून सवारी करताना दिसत आहे.

ms dhoni seen driving black mercedes g class with 0007 number plate video goes viral all about the car
कॅप्टन कूल धोनीची Mercedes G Class मधून सवारी; नंबर प्लेट पाहून चाहतेही चकित; पाहा Video (photo – bajaj.sumeetkumarand instagram)

भारताचा माजी कर्णधार एम. एस. धोनी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येतो. त्यात त्याचे बाइकवरील प्रेम सर्वांनाच ठाऊक आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओतून अनेकदा धोनीसाठी बाइक किती जिव्हाळ्याचा विषय याची प्रचिती येते. इतकेच नाही तर धोनीला आलिशान कारची खूप आवड आहे. अशातच धोनीचा एका आलिशान कार ड्रायव्हिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्यात धोनी मर्सिडीज बेंझ जी क्लास (Mercedes Benz G Class)मधून सवारी करताना दिसत आहे. या कारची नंबर प्लेट पाहून चाहतेही चकित झाले आहेत.

धोनीचा मर्सिडीज कार सवारीचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी धोनीचा टेनिस खेळतानाचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. धोनी आगामी आयपीएलसाठी सध्या फिटनेसकडे खूप लक्ष देत आहे. त्याबरोबरच तो आपली लाइफदेखील खूप एन्जॉय करताना दिसतोय. याचदरम्यान धोनीचा ‘टेनिस पार्टनर’ सुमित कुमार बजाजने त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

young girls dance on marathi song by wearing nauvari saree
मराठी पोरींचा स्वॅग! डोळ्यावर चष्मा अन् नाकात नथ; नऊवारी नेसून तरुणींनी केला भन्नाट डान्स, व्हिडीओ व्हायरल
Theft jump in river to save his self from police
VIDEO: चित्तथरारक! चोर पुढे पुढे आणि पोलीस मागे मागे; शेवटी चोरानं नदीत घेतली उडी अन्…शेवट पाहून व्हाल अवाक्
Viral Video
‘थ्री इडियट्स’मधील स्टंट पुन्हा आला समोर, बेशुद्ध आजोबांबरोबर नातवाची बाईकवरुन इमर्जन्सी वॉर्डमध्ये एन्ट्री अन्… Video व्हायरल
The bride painted a love story on the wedding shawl; Watch Navradeva's reaction once Video Viral
भारीच की! नवरीने लग्नाच्या शालूवर कोरली लव्हस्टोरी; नवरदेवाची रिएक्शन एकदा पाहाच, Video Viral

हा व्हिडीओ रांचीमधील असल्याचे सांगण्यात येत आहे; ज्यामध्ये धोनी काळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये बसला आहे. काळ्या रंगाची SUV मर्सिडीजची किंमत सुमारे ३.३ कोटी रुपये आहे; पण त्याची नंबर प्लेट पाहून चाहतेही चकित झाले आहेत. माहीच्या कारचा क्रमांक ‘JH01FB0007’ आहे. धोनीचा 7 हा गोल्डन नंबर आहे. तसेच त्याच्या जर्सीचा नंबरही 7 आहे आणि त्यामुळेच त्याने कारची नंबर प्लेटही 07 अशीच घेतली आहे.याआधीही धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यामध्ये माही टी-शर्टने फॅनची बाइक साफ करून, ऑटोग्राफ देताना दिसला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ms dhoni seen driving black mercedes g class with 0007 number plate video goes viral all about the car sjr

First published on: 30-11-2023 at 13:31 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×