Mukesh Ambani Funny Moment Video Viral: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटचे उद्घाटन केले होते तर आज १२ जानेवारीला या समिटचा शेवटचा दिवस असणार आहे. व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची थीम ‘गेटवे टू द फ्युचर’ (भविष्याकडे नेणारे दार) अशी आहे. या समिटची ही दहावी आवृत्ती असून ३४ देश आणि १६ संस्था सहभागी झाल्या आहेत. २००३ पासून सुरु झालेल्या या परिषदेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील महत्त्वाचे नाव म्हणजेच रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे भाषण यंदा समिटमध्ये बहुचर्चित ठरले. अंबानी यांच्या “रिलायन्स ही गुजराती कंपनी आहे व राहील” या विधानावरून सध्या सोशल मीडियावर टीका होत आहे तर रिलायन्सच्या आगामी योजनांविषयी काही प्रमाणात कौतुकही होत आहे. या टीका व कौतुकाच्या चर्चांमध्ये अंबानींचाच एक नवा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतोय.

गांधीनगर येथे पार पडत असलेल्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटच्या ठिकाणी पोहोचत असताना मुकेश अंबानी यांच्या आजूबाजूला अनेकांनी गर्दी केली होती. एखाद्या बॉलिवूड कलाकाराप्रमाणे अंबानी यांचे चाहते सुद्धा सेल्फी व व्हिडीओसाठी प्रयत्न करत होते. अशातच एका चाहत्याने अंबानी यांनी अशा काही नावाने हाक मारली की अंबानी स्वतःचे हसू थांबवू शकले नाहीत. त्यांनी खास वळून या हाक मारणाऱ्या व्यक्तीच्या दिशेने हसून अभिवादन केले. अंबानींच्या या प्रतिक्रियेला पाहून अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. अंबानी हे नाव सेलिब्रिटींच्या यादीतले असूनही त्यांना माणुसकी आहे असेही काही जण या व्हीडीवर कमेंट करून म्हणत आहेत. तर नेमकं असं या व्यक्तीने अंबानींसाठी काय नाव वापरलं असेल असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. चला तर मग व्हिडीओ पाहूया…

Video: मुकेश अंबानींना मजेशीर हाक मारताच..

हे ही वाचा<< “तेव्हा राग येतो, गिलने अजून..”, रोहित शर्माने शुबमन गिलवर भडकण्याचं सांगितलं कारण; IND vs AFG सामन्याचा Video चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही पाहिलंत त्याप्रमाणे अंबानी यांना मुकेश काका म्हणून हाक मारली गेली होती, ज्यानंतर अंबानी यांनी या व्यक्तीकडे बघून स्मितहास्य केले. ट्विटर (X) युजर @bijjuu11 या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. “एका माणसाने अंबानींना मुकेश काका अशी हाक मारली आणि खरा गुजराती माणूस हे ऐकल्यावर हसल्याशिवाय राहणार नाही” असे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. अनेक अन्य अकाउंटवर सुद्धा हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता.