Mumbai Indians vs Punjab Kings Match: आयपीएलच्या ४६व्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर पंजाब किंग्जचे आव्हान होते. दोन्ही संघांमधील हा सामना मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या मैदानात पार पडला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लियाम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर पंजाब किंग्सने मुंबई इंडियन्सला विजयासाठी २१५ धावांचे आव्हान दिले होते. हा सामना अगदी दमदार कामगिरी करत मुंबईने आपल्या नावे केला. या मॅचनंतर मुंबई इंडियन्सने पंजाबच्या संघाला टार्गेट करत एक भन्नाट ट्वीट केले आहे. यात मुंबईच्या पलटणने थेट पोलिसांकडे धाव घेतलेली दिसतेय.

मुंबई इंडियन्सने ट्वीट करत लिहिले की, “सर्व पोलीस विभागांना, येथे तक्रार करण्यासाठी काहीही नाही. आम्ही नुकताच मोहालीत क्रिकेट खेळलो आणि इथे एका संघाची धुलाई केली आहे. आता या बाबीची काळजी घेणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणे तुमच्या सेवेबद्दल धन्यवाद”. या ट्वीटला मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी सुद्धा भरपूर शेअर केले आहे.

मुंबई इंडियन्स ट्वीट

हे ही वाचा<< “हे पळपुटे पैसे घेतात आणि..” गौतम गंभीरची विराट कोहलीशी भांडणानंतर पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ Video वर फॅन्स भडकले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरंतर पंजाब किंग्सने समोर ठेवलेल्या मोठे आव्हान मुंबईला पेलणार का असा प्रश्न होताच पण खेळाच्या दुसऱ्या टप्प्यात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्या शतकी भागीदारीने मुंबईला सलग दुसऱ्या सामन्यात दोनशेचा आकडा गाठण्यात यश आले. मुंबईसाठी इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली. इशानने ४१ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने सात चौकार आणि चार षटकार मारले. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. त्याने आठ चौकार आणि दोन षटकार मारले.