Mumbai Local Shocking Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. यात महिलांच्या डब्यातही रोजच्या रोज भांडण पाहायला मिळतात. पण अनेकदा महिलांना लेडिज डब्यातदेखील सुरक्षित वाटत नाही. अनेकदा काही पुरुष आपलीच ट्रेन समजून महिलांच्या डब्यात चढतात आणि त्यांना त्रास देतात. सध्या अशीच एक घटना चुनाभट्टी येथे घडलीय. नेमकं काय घडलंय, जाणून घेऊ या…
व्हायरल व्हिडीओ (Ladies Coach Drunk Man Vulgar Viral Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओमध्ये एक मद्यधुंद अवस्थेत असणारा तरुण मुंबई लोकलच्या लेडीज डब्यात चढला आणि अश्लील वर्तन करू लागला.
१४ जून रोजी सकाळी ८ वाजता चूनाभट्टी स्टेशनवर एक मद्यधुंद व्यक्ती लोकलच्या महिला डब्यात शिरला आणि त्याने प्रवाशांसमोर पँट काढायचा प्रयत्न केला. ही ट्रेन हार्बर लाईनमार्गे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर (सीएसएमटी) जात होती. एका महिला प्रवाशाने हे दृश्य मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर टाकले.
तो व्यक्ती पूर्णपणे नशेत होता आणि महिलांकडे बघत कपडे काढायचा प्रयत्न करत होता. त्याला बाहेर जाण्यास सांगितले असता तो पटकन दरवाज्याजवळ गेला. वाटत होते की तो धावत्या गाडीतून उडी मारेल, पण त्याने स्वतःला सावरले. ट्रेन वडाळा स्टेशनजवळ येताच तो दुसऱ्या डब्यात गेला. प्रवाशांनी त्याला महिला डब्यातून हटवल्यानंतर पोलिसांकडे तक्रार केली, पण स्टेशनवर किंवा हेल्पलाइनवरून कोणतीही मदत मिळाली नाही.
व्हिडीओमध्ये महिला त्या तरुणाला ”ए हलकट, हा लेडिज डब्बा आहे हे समजत नाही का…” असं म्हणताना दिसतेय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @vognews.live या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल २. ८ मिलियन व्ह्युज आले आहेत. तसंच “१४ जून रोजी चुनाभट्टी स्थानकावर एका मद्यधुंद पुरूषाने लोकल ट्रेनच्या महिला डब्यात प्रवेश केला आणि प्रवाशांसमोर त्याची पँट काढण्याचा प्रयत्न केला.” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “इतक्या महिला ट्रेनमध्ये असताना फक्त ती एकटीच त्याच्याविरोधात उभी राहिली… एका रीलने खूप काही शिकवलं” तर दुसऱ्याने “त्याने हे जाणूनबुजून केल्याचं दिसतंय” अशी कमेंट केली.
दरम्यान, याबाबत मंगळवारी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपीविरोधात विनयंभगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.