Mumbai Local Viral Video: मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी ठिकठिकाणाहून लोक मुंबईत येतात आणि मुंबईचेच होऊन जातात. या धकाधकीच्या जीवनात दर दिवशी लोकलमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. दररोज सकाळी कामावर जाणाऱ्यांची लगबग आणि धक्काबुक्की करत ‘अंदर बहुत जगा है’ असं म्हणत मुंबई लोकलमध्ये दर दिवशी असंख्य माणसांची गर्दी पाहायला मिळते.

दररोजच्या या लोकल प्रवासाची अनेकांना सवय झालेली असते. नोकरीसाठी अनेक लोक अगदी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकलमधून प्रवास करतात. सध्या मुंबई लोकलचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात भरगच्च लोकलमधून प्रवासी प्रवास करतायत. तर काहींना गर्दीमुळे आत शिरायलाही जागा दिसत नाहीय.

मुंबई लोकलचा व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये एक माणूस चढण्याचा प्रयत्न करत आहे. लोकलमध्ये प्रवाशांची अफाट गर्दी असूनही नोकरदार वर्ग कामाला जाण्यासाठी याच गर्दीतून दररोज प्रवास करतो. मग अशात जीवाची पर्वा न करता काहीजण ट्रेनला लटकून प्रवास करतात. ट्रेनला लटकल्यामुळे अपघात झाल्याच आपण अनेकदा ऐकतही असतो पण जीव मुठीत घेऊन कित्येक लोक या लोकलने प्रवास करतात.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @aprajeet_motivation या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर “कमावणं आणि जमवणं एवढंच काही आयुष्य राहीलं आहे. जबाबदारीपुढे फक्त कष्ट हाच पर्याय उरतो” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. तर व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मुंबईकरांचं आयुष्य असंच आहे” तर दुसऱ्याने “थोडे पैसे कमावण्यासाठी दररोज त्रास सहन करावा लागतो” अशी कमेंट केली.