Shocking video: सोशल मीडियावर तुम्ही अनेक प्रकारचे व्हिडीओ पाहिले असतील. त्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्यातील दृश्यं चमत्कारयुक्त वाटली असतील. परंतु, कित्येकांचा चमत्कारादी बाबींवर विश्वास नसतो. तुमचाही चमत्कारावर विश्वास नसेल, तर हा व्हिडीओ पाहा. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. कधी रेल्वेत, तर कधी विमानात बाळाचा जन्म झाल्याची काही प्रकरणं आहेत. असाच एका बाळाचा जन्म मुंबईतील एका रेल्वे स्टेशनवर झाला आहे. विशेष म्हणजे एका तरुण प्रवाशाने या महिलेची यशस्वी डिलिव्हरी केली आहे.

मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. राम मंदिर रेल्वे स्थानकावर मेडिकल सुविधा नसताना विकास बेद्रे या तरुणाने तात्काळ डॉक्टर मैत्रिण देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय अनुभव नसतानाही विकासने यशस्वीरित्या महिलेची प्रसूती केली.

एक गर्भवती महिला गोरेगाव रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे लोकल ट्रेनने प्रवास करत होती. प्रवास करत असताना अचानक तिला तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्या. ती मदतीसाठी ओरडू लागली. तिच्या मदतीसाठी कोणी धावून आले नाही. यावेळी त्यातच डब्ब्यातून प्रवास करणारा विकास दिलीप बेद्रे या तरुणाने तात्काळ ट्रेनची इम्रर्जन्सी चैन ओढली. यामुळे राम मंदिर रेल्वे स्थानकावर लोकल थांबली. तरूणाने डॉ. देविका देशमुख यांनीही मध्यरात्रीची वेळ असतानाही माणुसकीच्या नात्याने लगेचच तो उचलून प्रतिसाद दिला. यानंतर देविका यांनी विकास बेद्रे यांना व्हिडीओ कॉलवर प्रसूतीची संपूर्ण प्रक्रिया स्टेप-बाय-स्टेप समजावून सांगितली. विकास बेद्रे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कोणत्याही वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव नसतानाही, डॉक्टरांनी सांगितलेल्या प्रत्येक सूचनांचे तंतोतंत पालन केले.

पाहा व्हिडीओ

घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने आई आणि बाळाला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवले, जिथे दोघांचीही प्रकृती सध्या सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विकास बेद्रे आणि डॉ. देविका देशमुख यांच्या तात्काळ प्रतिसादामुळे एका जीवाला नवसंजीवनी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ manjeet9862_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय की, “हा देवासारखा धावत आला” तर आणखी एकानं, वाह मुंबईचा रँचो अशी प्रतिक्रिया दिली आहे.