Mumbra Train Accident video: मुंब्र्यात झालेल्या रेल्वे अपघातानं संपूर्ण राज्य हादरलं आहे. सोमवार, ९ जून रोजी मुंबईजवळ दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान मोठा रेल्वे अपघात झाला. कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू झाला. लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती त्यामुळे दरवाजाला लटकून प्रवास करत होते. दुसरी लोकल कल्याणच्या दिशेने जात होती. या लोकलमुळे दरवाजात लटकून उभ्या असलेल्या प्रवाशांना धक्का लागला आणि ते खाली पडले अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून परिस्थिती जैसे थेच आहे. याचच उदाहरण दाखवणाराचा मुंबई लोकलचा आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सर्वसामान्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. सकाळी कामावर जाताना रोजची ट्रेन चुकली तर ऑफिसात जायला उशीर होणार या भीतीने मुंबईकर लोलकच्या मागे जीव मुठीत धरुन धावतो आणि लोलकमध्ये चढतो. काही मंडळी अक्षरश: पूर्ण ताकत एकवटून डब्यात शिरण्याचा प्रयत्न करतात. काही जणं तर फुटबोर्डवर एक पाय ठेवून पूर्ण प्रवास करतात.हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा याला स्पिरिट म्हणायचं की नाईलाज ?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मुंबईच्या लोकलमधील हा डबा आहे. या डब्यात खच्चून गर्दी आहे. इतकरी गर्दी आहे की, प्रवासी अक्षरश: लोकलच्या बाहेर लटकत आहेत. हे प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. यातील एकानं जरी थोडीशी हालचाल केली तरी सगळे लोकलमधून पडण्याची शक्यता आहे. एवढी रिस्क घेऊन या लोक रोज प्रवास करत आहेत. मुंबईकर ही कसरत दररोज करतात. अन् त्यांच्या या कसरतीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लोकल मृत्यूचा सापळा बनत आहे. त्यामुळे तुम्हीह मुंबईकर असाल कर प्रवास करताना स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.