NASA देणार झोपायचे पैसे ?
नासा (Nasa) म्हणजेच ‘नॅशनल अॅरोनॉटिक्स अॅन्ड स्पेस एजन्सी’ या अमेरिकन संस्थेमध्ये भरती सुरु झाली आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना झोपायचे पैसे मिळणार आहे. नासासंबंधित ही गोष्ट प्रचंड प्रमाणात व्हायरल झाली आहे. यामुळे लोकांची या नोकरीबद्दलची उत्सुकता वाढली आहे. माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार, युरोपियन स्पेस एजन्सी आणि नासाचे जर्मन एरोस्पेस सेंटर मिळून बऱ्याच काळापासून कृत्रिम गुरुत्वाकर्षण बेड रेस्टसंबंधित संशोधन करत आहे. त्यांच्या या प्रयोगामध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींना महिन्याला १३ ते १४ लाख रुपये दिले जातात असे म्हटले जात आहे.
नासाच्या संशोधनातील प्रयोगामध्ये व्यक्तीला बेडवर झोपवले जाते आणि त्याच्या शरीराचा अभ्यास केला जातो. एका जागी दिवसरात्र झोपून राहिल्यावर मानवी शरीरामध्ये काय बदल होऊ शकतात याबद्दल शास्त्रज्ञ जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. नॅशनल अॅरोनॉटिक्स अॅन्ड स्पेस एजन्सी या अमेरिकन संस्थेद्वारे सदर प्रयोगामध्ये याआधीही अनेकजण सहभागी झाले आहेत. या प्रयोगामध्ये सहभाग घेणाऱ्यांना दोन महिने शास्त्रज्ञांच्या देखरेखीखाली राहावे लागते.
आणखी वाचा – मी झोपलेलो नाही तर…नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना यांचा मजेदार खुलासा, फोटो व्हायरल
सोशल मीडियावर आहे नोकरीची चर्चा
अमेरिकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, नासाच्या कृत्रिम गुरुत्वाकर्षण बेड रेस्ट प्रयोगामध्ये सहभागी झालेल्या लोकांना दोन महिन्यांच्या कालावधीसाठी तब्बल १८ हजार अमेरिकन डॉलर्स म्हणजेच १४ लाख रुपये दिले जातात. म्हणजे त्यातील एका व्यक्तीवर एका महिन्यात ७ लाख रुपये खर्च केले जातात. दरम्यान ही गोष्ट खरी आहे की खोटी याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. काहीजणांनी ही गोष्ट खोटी, नकली असल्याचेही म्हटले आहे.