अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने हिमालयापासून बहामासपर्यंत अंतराळातून घेतलेले पृथ्वीचे आश्चर्यकारक फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत बर्फाच्छादित हिमालय भारताला चीनपासून कसे वेगळे करतो हे दिसते तर, दुसऱ्या फोटोत बहामासमधील टीलचे पाण्याचे सरोवर दिसते आहे. नासा आपल्या विश्वाचे अद्भुत फोटो शेअर करत आहे. हे पाहून अंतराळाची आवड असणारे लोक आनंदी होतात.

अंतराळाची आवड असलेल्यांसाठी नासाच्या पोस्टमध्ये खजिना

नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA) चे सोशल मीडिया हँडल म्हणजे ज्यांना पृथ्वी आणि अंतराळाशी संबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ आणि आश्चर्यकारक फोटो पाहायला मिळतात त्यांच्यासाठी एक खजिना आहे. अंतराळ संस्थेने इंस्टाग्रामवर आपल्या नवीन फोटो पोस्टमध्ये फोटोंची मालिका सादर करून आपल्या लोकांचे मने जिंकली आहेत.

हिमालयाच्या प्रतिमेच्या कॅप्शनमध्ये नासाने काय लिहिले?

नासाच्या पोस्टमध्ये अंतराळातून घेतलेल्या हिमालयाच्या फोटोचाही समावेश आहे. नासाने त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “पृथ्वी: त्यामध्ये रेंज आहे.” याबरोबर NASA ने लिहिले आहे की, “इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (@ISS) अंदाजे दर ९० मिनिटांनी १७५०० मैल(३,६६,००० किलोमीटर) प्रति तास या वेगाने पृथ्वीभोवती फिरते. अंतराळवीराच्या दृष्टीकोनातून जग कसे बदलते, हे पाहा”

हेही वाचा – “अशक्यही शक्य करतो तो बाप!” सुरक्षा रक्षकाने लेकीला शिक्षणासाठी पाठवले परदेशात; सेलेब्सने केले कौतुक, Video Viral

इंस्टाग्रामवर नासाने पोस्ट केलेल्या फोटोची माहिती

इंस्टाग्राम पोस्टमधील फोटोच्या तपशीलानुसार, पहिल्या चित्रात बर्फाच्छादित हिमालय भारताला चीनपासून वेगळे कसे करत असल्याचे दाखवले आहे. NASA ने लिहिले, “फोटोमध्ये दिसते आहे की, शुभ्र बर्फाच्छादित पर्वत डावीकडून उजवीकडे पसरलेले आहेत .” दुसरा फोटोमध्ये बहामासचे टील पाणी दिसते. तिसऱ्या फोटोत रात्रीच्या वेळी बोस्टन शहरातील लाइटिंग दिसत आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने रियाध आणि ब्रिटिश कोलंबियामधील बर्फाच्छादित किनाऱ्यावर असलेल्या पर्वतांचे फोटो देखील दिसत आहे.

हेही वाचा – भावाला इंडिगोमध्ये नोकरी मिळाली, एअरहोस्टेस बहिणीने दिले सरप्राईज, हृदयस्पर्शी व्हिडिओने जिंकले नेटकऱ्यांचे मन

इंस्टाग्रामवरील नासाच्या पोस्टला काही तासांतच २,५७,०००० हून अधिक लाईक्स आणि शेकडो शेअर केले आहे. व्हिडीओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, “खूप सुंदर.” आणखी एका युजरने कमेंट केली की, “OMG, आपला ग्रह इतका सुंदर दिसतो, माझा विश्वास बसत नाही.”

नासाने नुकतेच हे आश्चर्यकारक फोटो शेअर केले आहेत

फेब्रुवारीच्या सुरुवातीला, नासाने अलीकडेच अमेरिकेच्या डेथ व्हॅलीमध्ये तयार झालेल्या तात्पुरत्या तलावाचे आधी आणि नंतरचे उपग्रह फोटो शेअर केले होते. नासाच्या उपग्रह फोटोंनी वादळापूर्वी आणि नंतर डेथ व्हॅलीचे बॅडवॉटर बेसिन हे दृश्य कैद केले आहे. नासा अर्थ वेधशाळेनुसार, ऑगस्ट २०२३ मध्ये हिलरी चक्रीवादळानंतर हा तलाव तयार झाला आणि हळूहळू कमी झाला. जरी संपूर्ण शरद ऋतूतील आणि हिवाळ्यात तलाव कोरडे राहिले, तरीही ते फेब्रुवारी २०२४ मध्ये पुन्हा भरले.