Shocking vido: सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे . रस्त्यावर अनेक भटके प्राणी फिरत असतात. कुत्रे, गायी, म्हशी, बैल, असे वेगवेगळे प्राणी रस्त्यावर दिसतात. कधी कधी हे प्राणी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर हल्ला करतानाही दिसतात. त्यामुळे भटक्या प्राण्यांविषयी लोकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.

अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. चवताळलेल्या गायींनी शिंगावर उचलून पायाखाली तुडवल्यामुळे रस्त्याने पायी जात असलेल्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. हा सारा धक्कादायक प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून अनेकजण आजूबाजूला असतानाही त्यांना या वृद्धाला वाचवता आलं नाही. कळवण- शहरात मोकाट गायींनी केलेल्या हल्ल्यात एका ज्येष्ठाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली. भालचंद्र मालपुरे (वय ७९)असे मृत ज्येष्ठांचे नाव आहे. मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भालचंद्र रघुनाथ मालपुरे हे वृद्ध दुचाकीवर मागे बसून रस्त्याने जाताना खाली उतरले. मात्र खाली उतरल्या उतरल्या त्यांच्यावर दोन मोकाट गाईंनी हल्ला केला. या गायींनी मालपुरे यांना शिंगावर उचलून रस्त्यावर आपटत पायाखाली तुडवले. लोक गायींना मालपुरेंपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते तरी गायी त्यांना पायाने आणि शिंगाने हल्ला करत होत्या. गंभीर जखमी मालपुरे यांना नागरिकांनी कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान मालपुरे यांचा मृत्यू झाला.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण चर्चा करत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया वर shreerangkhare नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. प्राण्यांचे असे व्हिडीओ सोशल मीडियावर कायमच पहायला मिळते. भटक्या प्राण्यांच्या अशा दहशतीमुळे लोकांच्या मनात भिती बसली आहे.