Navi Mumbai News: नवी मुंबईतील एका सोसायटीत धक्कादायक प्रकार घडला आहे. या सोसायटीच्या लिफ्टमध्ये एका व्यक्तीने महिलेसमोर घाणेरडे चाळे केले आहेत. सदर व्यक्तीने केलेले हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या सर्व प्रकारामुळे लिफ्टमधील महिला भयभीत झाल्याचे दिसत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओच्या आधारे आरोपीला अटक केली. एका कार्यकर्त्याने ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. ही माहिती त्याने पोलिसांना टॅगही केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्बल आर्च नावाच्या तळोजा हाउसिंग सोसायटीमध्ये ही घटना घडली. कार्यकर्त्या बीनू वर्गीस यांनी ट्विट केले की, “लिफ्टमध्ये एका तरुणाला महिलेशी गैरवर्तन करताना पाहिले आहे. ही घटना नवी मुंबईतील मार्बल आर्चमध्ये घडली आहे.” या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला. तपासानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडिओ मिळाला, त्यानंतर घटनेची माहिती मिळाली. लिफ्टमधील पुरुष महिलेसोबत अश्लील कृत्य करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणाची दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर

( हे ही वाचा: बापरे! रिक्षेत ३ माणसांच्या जागेवर बसले तब्बल १९ प्रवासी; बाहेर काढून पोलीसही थकले)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लिफ्टमधील पुरुष महिलेसमोर अश्लील कृत्य करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या प्रकरणाची दखल घेत नवी मुंबई पोलिसांनी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावून तिचा जबाब नोंदवला असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.