Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन हा व्यक्तीची बौद्धिक क्षमता ओळखणारा खेळ आहे. अनेक जणांना ऑप्टिकल इल्यूजन सोडवायला आवडतात. सोशल मीडियावर अनेक ऑप्टिकल इल्यूजन व्हायरल होत असतात. काही ऑप्टिकल इल्यूजन इतके कठीण असतात की सोडविणे कठीण जाते. सध्या असाच एक ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये एक चूक आहे, ती आपल्याला शोधून काढायची आहे.

व्हायरल ऑप्टिकल इल्यूजन

या व्हायरल ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोमध्ये तुम्हाल A ते Z पर्यंत इग्रजी वर्णमाला दिसेल. त्या खाली लिहिलेय, “जितके तुम्ही शांत राहाल तेवढं तुम्हाला चूक शोधणे, सोपी जाईल.” खरंच या फोटोमध्ये कोणती चूक दिसतेय का? हे ऑप्टिकल इल्यूजन दिसायला जितके सोपी आहे तितकेच सोडवायला कठीण आहे.

Anu Sehgal या एक्स अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटेच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “तुम्ही शोधू शकता का?” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजरने लिहिलेय, “मी शोधू शकलो नाही” तर एका युजरने लिहिलेय, “हे खूप कठीण ऑप्टिकल इल्यूजन आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद देवा मी इंग्रजी वर्णमाला वाचण्यापूर्वी खालील नोट वाचली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरंच या फोटोमध्ये कोणती चूक दिसतेय का?

या व्हायरल फोटोमध्ये चूक शोधण्यासाठी तुम्ही A ते Z पर्यंत इग्रजी वर्णमाला नीट वाचली असेल पण तुम्हाला त्यात काहीही चूक दिसून आली नसेल. तुम्हाला प्रश्न पडणे साहजिक आहे की मग या फोटोमध्ये चूक कुठे आहे? फोटो नीट पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की चूक A ते Z इग्रजी वर्णमालेत नसून खालील नोटमध्ये आहे. या नोटमध्ये इंग्रजीत लिहिलेय, “The calmer you are, the easier it is to fnid the mistake” हे वाक्य वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ती ‘Find’ या इंग्रजी अक्षराची स्पेलिंग चुकलेली आहे आणि हिच ती चूक या फोटोमध्ये आहे.