राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकण्यात अपयश आल्याने महिला कुस्तीपटू पूजा गहलोतने भावूक होत देशाची माफी मागितली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून तिचं सांत्वन करत हा क्षण माफी मागण्याचा नव्हे, तर विजयोत्सव साजरा करण्याचा आहे असं सांगत पाठ थोपटली. नरेंद्र मोदींच्या या कृतीचं फक्त भारतच नव्हे तर पाकिस्तानमध्येही कौतुक होत आहे. पाकिस्तानमधील पत्रकाने यानिमित्ताने आपल्या सरकारवर टीका केली असून आपल्या नेत्यांना खेळाडू पदक जिंकतायत हे माहिती तरी आहे का? अशी विचारणा केली आहे.

नेमकं काय झालं?

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटू पूजा गहलोतने ५० किलो वजनी गटात खेळत होती. कुस्तीच्या उपांत्य फेरीत गहलोतने चांगला खेळ केला, पण तिला सामना जिंकता आला नाही. त्यामुळे तिला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पूजाला अश्रू अनावर झाले. आपण देशासाठी सुवर्णपदक जिंकू शकलो नाही, याबाबत तिने जाहीरपणे माफी मागितली.

misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
Amit Shah claims that there is no encroachment of even an inch by China
चीनकडून एका इंचावरही अतिक्रमण नाही; अमित शहा यांचा दावा; पहिले पंतप्रधान नेहरूंवर टीकास्त्र
Manmohan Singh journey from economic reform face to accidental PM analysis by Neerja Chowdhury
आर्थिक सुधारणांचा शिल्पकार ते ‘अपघाती पंतप्रधान’; निवृत्तीनंतर मनमोहन सिंगांना इतिहास न्याय देईल?
sheikh hasina
“आधी तुमच्या बायकांच्या साड्या जाळून टाका”, Boycott India मोहिमेवर बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विरोधकांना आव्हान!

CWG 2022: सुवर्णपदक जिंकण्यात अपयश आल्याने खेळाडूने रडत मागितली माफी! पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “तू…”

“सुवर्णपदक जिंकत येथे भारताचं राष्ट्रगीत ऐकलं जावं अशी माझी इच्छा होती. परंतु, फक्त एक कांस्य पदक जिंकू शकले. त्याबद्दल मी माफी मागते,” असं पूजा म्हणाली.

मोदींनी केलं सांत्वन

पूजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून तिचं सांत्वन केलं. “पूजा, तू मिळवलेलं पदक आनंद साजरा करण्यासारखी बाब आहे, माफी मागण्याची नाही. तुझा जीवनप्रवास आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. तुझ्या यशामुळे आम्हाला आनंद झाला आहे. भविष्यात तू देशासाठी आणखी चांगली कामगिरी करशील,” असे ट्वीट पंतप्रधानांनी केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं हे ट्विटरही सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. अनेकांनी मोदींच्या या कृतीचं कौतुक केलं. यामध्ये पाकिस्तानमधील पत्रकार सिराज हसन यांचाही समावेश होता.

सिराज हसन काय म्हणाले –

सिराज हसन यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून मोदींचं कौतुक केलं. ते म्हणाले “अशाप्रकारे भारत आपल्या खेळाडूंना प्रोजेक्ट करत आहे. पूजा गहलोतने कांस्यपदक जिंकल्यानंतर सुवर्णपदक न जिंकल्याने दु:ख व्यक्त केलं असता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिला उत्तर दिलं. पाकिस्तानचे पंतप्रधान किंवा अध्यक्षांकडून असा संदेश कधी पाहिला आहे का? पाकिस्तानी खेळाडू पदक जिंकत आहे हे तरी त्यांना माहिती आहे का?”.

सोशल मीडियावर अनेकांनी नरेंद्र मोदींच्या कृतीचं कौतुक केलं असून खुद्द पंतप्रधान अशाप्रकारे पाठबळ देत असतील तर खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो असं ते म्हणत आहेत.