Pakistan Viral Video: भारताचा शेजारील देश पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमी चर्चेत येत असतो. कधी महागाईमुळे तर कधी आपल्या विचित्र कारनाम्यांमुळे तो चर्चेत येत असतो. नेहमीच आपल्या निरनिराळ्या गोष्टींसाठी पाकिस्तान चर्चेचा विषय बनत असतो. मग ते राजकारण असो, खेळ असो, मनोरंजनसृष्टी असो वा तेथील उद्योगधंदे. पाकिस्तानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी आपल्याला हसवतात तर कधी थक्क करून जातात. आता पाकिस्तानातील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही चकित व्हाल… नेमकं काय घडलं ते जाणून घ्या…
जगातील अनेक लोक इस्रायलबद्दल संतापले आहेत, हे सर्वांनाच माहिती आहे. गेल्या काही वर्षांत, सोशल मीडियावर इस्रायली उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू आहे. आता पाकिस्ताननेही त्यात उडी घेतली आहे, पण या निषेधादरम्यान पाकिस्तानच्या लोकांनी केलेल्या कृतीने सर्वांनाच धक्का बसला आहे, ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेमकं काय घडलं ते जाणून घ्या…
पाकिस्तानमधून एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून आश्चर्य आणि चिंता दोन्ही वाटते. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये काही तरुण आणि सामान्य लोक कॅमेऱ्यासमोर तोंडाने सॅनिटरी पॅड फाडताना दिसत आहेत. कारण? ही पॅड्स इस्रायली कंपन्यांची आहेत आणि त्यांचा वापर करणे म्हणजे इस्रायलला मदत करण्यासारखे आहे अशी अफवा पसरली आहे. व्हिडीओ शेअर करतानाही हाच दावा केला जात आहे आणि मग कोणताही विचार न करता, कोणतीही पडताळणी न करता, देशभक्तीची स्पर्धा सुरू झाली आणि लोकांनी इस्रायलच्या द्वेषाने तोंडाने सॅनिटरी पॅड फाडायला सुरुवात केली. आणि आता या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ @ocjain4 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे; तर अनेकांनी व्हिडीओला लाईकदेखील केले आहे. या व्हिडीओवर सोशल मिडीयावर भरभरून कमेंट्स येताना दिसत आहे. नेटकरी व्हिडीओबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले… “भाऊ, या लोकांना काय अडचण आहे?” दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले, “काय अज्ञानी लोक आहेत ते, तोंडाने पॅड फाडत आहेत; तर आणखी एका वापरकर्त्याने लिहिले… “अरे, ते सॅनिटरी पॅड वापरले गेले नाही ना?, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.