जल्लीकट्टू च्या निमित्ताने तामिळ अस्मितेचा प्रश्न झाल्यानंतर आता आपल्या संस्कृतीच्या रक्षणासाठी चिडायची वेळ आहे  केरळी जनतेची.

प्रसंग होता केंद्रीय मंत्री रामविलास पासवान आणि केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा. पासवान यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांची आपल्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतली. दोघा नेत्यांमध्ये चर्चा झाली. या भेटीचे फोटोही निघाले. पासवान यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या भेटीच्या संदर्भात ट्वीटही केलं.

या सगळ्यात फार काही विशेष नव्हतं. नेहमीची औपचारिक भेट होती. प्रोटोकाॅल आटपून सगळेजण आपापल्या कामांना लागले. पण तोपर्यंत ट्विटरवर वादळ उठलं होतं. कारण केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या जागी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचं नाव लिहिलं होतं.

चूक लक्षात आल्यावर पासवानांनी लगेचच्या लगेच दुरूस्ती केली. पण तोपर्यंत त्यांच्या चुकीच्या ट्वीटचे स्नॅपशाॅट्स सगळीकडे फिरत होते.

दक्षिण भारतीय नावं इतरांना आधीच क्लिष्ट वाटतात. त्यामुळे अनेकदा नावं लिहिताना गडबड होते. पण एखाद्या केंद्रीय मंत्र्यांनेच एखाद्या दक्षिण भारतीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं नाव लिहिताना एवढी मोठी गडबड करावी हे साहजिकच लोकांना आवडलं नाही.

काहीजणांनी रामविलास पासवान यांनी आता डोनाल्ड ट्रम्प भारताचे पंतप्रधान असल्याचं जाहीर करू नका अशी विनंती केली. तर काहींनी रामविलास पासवानांसारख्या विसराळू नेत्यांना मंत्रिपद दिल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केली.

VIDEO : काही सेकंदात पत्त्यांसारख्या कोसळल्या १९ इमारती

दक्षिण भारतीयांमध्ये भारतातल्या इतर प्रदेशांमधले लोक आपल्याला दुय्यम समजत असल्याची भावना आहे. हिंदी भाषाविरोधही या प्रदेशात तीव्र आहे. अशा वेळी उत्तरेतल्या एका केंद्रीय नेत्याने आमच्यातल्या ‘मद्रासी’ नेत्याच्या नावाविषयी असा अनादर दाखवला त्याबाबत ट्विटरकरांच्या भावना विशेष तीव्र होत्या.

वाचा- सावधान! ‘रिलायन्स जिओ’च्या नावे आलेला संदेश तुम्हाला अडचणीत आणू शकतो