Viral Video: काल १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात ७८ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला. या दिवशी जागोजागी तिरंगा ध्वज फडकावून स्वातंत्र्यदिनाचा उत्सव साजरा केला गेला. सध्या सोशल मीडियावर या दिवसाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो खूप व्हायरल होत आहेत. अशातच मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओ नावाच्या म्युझिक बँडने स्वातंत्र्यदिनानिमित्त खास सादरीकरण केले, ज्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. युजर्सही त्यांच्या या सादरीकरणाचे कौतुक करताना दिसत आहेत.

१५ ऑगस्ट रोजी (काल) स्वातंत्र्यदिनाचा आनंद साजरा करताना मुंबई पोलिसांच्या खाकी स्टुडिओ नावाच्या म्युझिक बँडने विविध देशभक्तिपर गाण्यांचा तालावर सादरीकरण केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mumbaipolice या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये, “या स्वातंत्र्यदिनी देशभक्तीचा योग्य मार्ग प्रहार करत आहोत! आम्ही आमच्या स्वातंत्र्याची कदर करत असताना, मुंबई पोलिस बँड आमच्या वैविध्यपूर्ण राष्ट्राच्या सुसंवादी भावनेचे उदाहरण देतो”, असं लिहिले आहे.

या व्हिडीओमध्ये बँडने ‘वंदे मातरम’, ‘ऐ वतन तेरे लिए’, आणि ‘आय लव्ह माय इंडिया’ या इतर काही बीट्ससह सादरीकरण केले. या व्हिडीओमध्ये मुंबई पोलिस निरीक्षक संजय कल्याणी हे मुंबई पोलिस बँडच्या देशभक्तिपर कार्यक्रमाचे संचालन करताना दिसत आहेत, ज्यात २० हून अधिक वादक सनई, बासरी, ड्रम, ब्रास बँड आणि आणखी काही वाद्ये त्यांच्यासह खाकी गणवेशात सादरीकरण करत आहेत.

हेही वाचा: थरारक! वाऱ्याच्या वेगाने धावून दोन सिंहांचा श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न; पुढे असं काही घडलं…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

View this post on Instagram

A post shared by Mumbai Police (@mumbaipolice)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर १३ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. तर अनेक या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. ज्यात एका युजरने पोलिसांचे कौतुक केले आहे. तर दुसऱ्या युजरने, मुंबई पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.