Viral Video: समाजमाध्यमांवर मनोरंजन करणाऱ्या व्हिडीओंसह अनेकदा थरकाप उडवणारे व्हिडीओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्यातील काही व्हिडीओ इतके भयानक असतात की, जे पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. या व्हिडीओंमध्ये सर्वाधिक पसंती प्राण्यांच्या व्हिडीओंना दिली जाते. जंगलातील हिंस्र प्राणी कशी शिकार करतात, शिकार करण्यासाठी कशी युक्ती लढवतात हे पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून अनेक जण अवाक् झाले आहेत. जगातील प्रत्येक सजीव आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करीत असतो. हिंस्त्र प्राणी आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात. बऱ्याचदा शिकार करण्यासाठी ते रात्रीच्या वेळी जंगलातून बाहेर येऊन मानवी वस्तीत शिरकाव करतात. त्यावेळी श्वानांवर, तर कधी गाई, म्हशींवर हल्ला करतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन सिंहांनी मानवी वस्तीमध्ये प्रवेश केल्याचे दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ गुजरातमधल्या एका गावातील असून, रात्रीच्या वेळी दोन सिंह शिकार शोधण्यासाठी गावात प्रवेश करतात. त्यावेळी त्यांना एका घराबाहेर दोन पाळीव श्वान दिसतात. पण, गेट लावलेले असल्यामुळे सिंहांना श्वानांवर हल्ला करणे शक्य होत नाही. यावेळी त्या दोन श्वानांपैकी एक तिथून घाबरून पळून जातो; पण दुसरा श्वान मात्र ते सिंह तिथून निघून जावेत आणि आपल्या जीवाचा धोका टळावा यासाठी मोठमोठ्याने त्यांच्यावर भुंकतो. त्यावेळी मागून दुसरा सिंह येतो आणि जोरात गेटवर हल्ला करतो. यावेळी गेट उघडते; पण श्वानाचे नशीब बलवत्तर होते म्हणून सिंहाला गेट उघडल्याचे दिसत नाही आणि ते तिथून निघून जातात. श्वानही खूप साहसी होता. सिंह गेल्यावर ते खरंच गेलेत की नाही याची खात्री करण्यासाठी तो गेटबाहेर येतो. इतक्यात घरातील एक वृद्ध व्यक्ती बाहेर आल्याचे दिसताच तो पुन्हा गेटच्या आत जातो. हेही वाचा: पारंपरिक वेश सोडून ‘अरबी कुथू’ गाण्यावर किली पॉलने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक पाहा व्हिडीओ: हा व्हिडीओ X(ट्विटर)वरील @imketanjoshi या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.