कोणतेही पर्यटन स्थळ हे त्याच्या सौंदर्यासाठी ओळखले जाते पण अनेकदा काही पर्यटक त्या पर्यटन स्थळाचे सौंदर्य खराब करतात. अनेकदा लोक वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देतात आणि तिथेच कचरा टाकतात. कधी एखाद्या ऐतिहासिक वास्तूवर स्वत:चे नाव कोरतात किंवा तिथेच थुंकतात. वाईट गोष्ट म्हणजे आपल्याच पर्यटन स्थळांचे सौदर्य आपण जपत नाही. अनेक लोक लांबून पर्यटन स्थळी भेट देतात आणि त्यांना काय पाहायला मिळते तर कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी, आणि अस्वच्छता. भारताचे नागरिक म्हणून भारतातील प्रत्येक पर्यटन स्थळाचे सौंदर्य जपणे आणि स्वच्छता राखणे हे आपले कर्तव्य आहे पण या कर्तव्याचा विसर अनेकांना पडलेला आहे. याची प्रचिती देणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला हिमाचल प्रदेशातील एका हिल स्टेशनजवळील धबधब्याला भेट देणारे लोक कसे दारू पित आहेत आणि तिथेच “कचरा” फेकत आहेत हे दिसते. या व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना हादरवून टाकले आहे.
सौम्या पाठक नावाच्या एका महिलेने इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडीओपमध्ये, ती एका हिल स्टेशनवरील धबधब्याजवळ उभी असल्याचे दिसते. तिथेच काही लोक दारू पिऊन गोंधळ घालत असल्याचे दिसते. हे दृश्य दाखवताना ती म्हणते, “खूप सुंदर धबधबा, पण लोक धबधब्याजवळ दारू पित आहेत. भारतात जिथे सुंदर ठिकाण असते तिथे लोक तिथे भांडवलशाही सुरू करतात, वस्तू विकतात, लोक कचरा फेकतात.
भांडवलशाहीवरील तिची टिप्पणी धबधब्याच्या जवळ उभारलेल्या दुकानांचा संदर्भ असून तेथे लोक वस्तू खरेदी करत आहेत आणि निष्काळजीपणे धबधब्याच्या परिसरात कचरा टाकत आहेत.
एकाने व्हिडीओवर कमेंट केली, “मला वाटते की हे एका अपयशी शिक्षण व्यवस्थेचे परिणाम आहे. ते शाळांमध्ये नागरी ज्ञान, मोटार वाहन नियम आणि मूलभूत संवैधानिक कायदे का शिकवू शकत नाहीत? भारतातील शाळांमध्ये नागरी ज्ञान आणि शिष्टाचार यावर एक पाठ्यपुस्तक असणे आवश्यक आहे.” दुसर्याने उपहासात्मक कमेंट केली आहे, “दुःखद, दुःखद, दुःखद परिस्थिती.”
तिसर्याने कमेंट केली की, तुम्ही बरोबर बोलत आहात, पुढची पिढी देखील चांगल्या पद्धतीने घडवली जात नाहीये.
चौथ्याने लिहिले की, अत्यंत वाईट, तुम्ही याबाबत आवाज उठवला हे पाहून आनंद झाला.
पाचव्याने लिहिले की,”हे दारुडे लोक अत्यंत सुंदर ट्रेकचे ठिकाणाची देखील वाट लावतात.”
सहाव्याने लिहिले की, स्थानिक लोकच पर्यटन स्थळ खराब करतात. यात ५० टक्के योगदान पर्यटकांचे असते.