Viral Video : गर्दीचा फायदा घेत रेल्वेस्थानक, बसस्थानक, कोणत्याही उत्सव आणि मेळाव्याच्या ठिकाणी पाकिटमारीच्या अनेक घटना घडतात. सध्या डिजिटल व्यवहारामुळे पाकिटमारी कमी होताना दिसत आहे. तरीसुद्धा सार्वजनिक ठिकाणी चोरटे संधी साधून पाकीट मारताना दिसून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक चोरटा बसमध्ये चढताना एका तरुणाचे पाकीट मारताना दिसून येत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका बसस्थानकावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, काही लोक बसमध्ये चढत आहेत. सीट पकडण्याच्या नादात बसमध्ये चढताना लोकांची गर्दी दिसून येत आहे. याच गर्दीचा फायदा एका चोरट्याने घेतला. चोरटा बसमध्ये चढणाऱ्या व्यक्तीच्या मागच्या खिशातून हळूच पाकीट काढताना दिसत आहे. पाकीट काढल्यानंतर तो गर्दीतून बाहेर पडताना दिसतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

हेही वाचा : Optical Illusions : लोकांच्या गर्दीत विराट कोहली दिसतो का? एकदा नीट क्लिक करून पाहा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

uttarkarnataka.official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने विचारले, “व्हिडीओ शूट करणाऱ्याने चोराला का पकडले नाही?” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, “चोराला पकडण्यापेक्षा व्हिडीओ शूट करणे गरजेचे होते का?”