Pitbull Attack Video : लाईटहाऊस जर्नालिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जाणारा एक व्हिडीओ आढळला. या व्हिडीओमध्ये एक पिटबुल जातीचा कुत्रा भररस्त्यात एका चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला करताना दिसत आहे. अनेक जण त्या चिमुकल्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडीओ नवी दिल्लीतील रोहिणी भागातील असल्याचा दावा केला जात आहे. पण, खरंच हा व्हिडीओ भारतातील आहे का याविषयीचे सत्य जाणून घेऊ….

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर दिलीप कुमार सिंग यांनी दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सही तोच व्हिडीओ त्याच दाव्यासह शेअर करत आहेत.

तपास :

आम्ही InVid टूलवर व्हिडीओ अपलोड केला आणि त्यातून काढलेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला.

आम्हाला तीन वर्षांपूर्वी AMARINTV या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेला व्हिडीओ आढळला.

ज्यात म्हटले होते की (थाईमधून भाषांतर), पिटबुलने एका परदेशी मुलाला गळ्याला धरून ओढले, यावेळी आया कुत्र्याकडे पाहात राहिली.

त्यानंतर आम्ही थाई भाषेत गूगल कीवर्ड सर्च केला, ज्यातून आम्हाला २२ जून २०२२ रोजीची एक फेसबुक पोस्ट मिळाली.

कॅप्शनमध्ये म्हटले होते की, पिटबुलने परदेशी मुलाला मानेला धरून ओढले. आयाने त्याला सोडून दिले आणि ती उभी राहून कुत्र्याकडे पाहात पाहिली.

कॅप्शनमध्ये ही घटना पट्टायामध्ये घडल्याचा उल्लेखही होता.

आम्हाला amarintv.com वर एक बातमी अहवाल सापडला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
https://www.amarintv.com/news/crime/138621#google_vignette

निष्कर्ष : एका चिमुकल्यावर कुत्र्याने हल्ला केल्याचा व्हायरल व्हिडीओ नवी दिल्लीतील रोहिणी भागातील नसून तो २०२२ मधील थायलंडमधील पट्टाया येथील आहे. व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.