PM Modi Meerut Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये आहेत. ते मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी करतील. मेरठमधील सरधना शहरातील सलावा आणि कैली गावात अंदाजे ७०० कोटी रुपये खर्चून विद्यापीठाची स्थापना केली जात आहे. पीएम मोदी मेरठमध्ये जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.
पायाभरणीपूर्वी पंतप्रधान मोदी हे प्रदर्शन पाहण्यासाठी पोहोचले. या प्रदर्शनात विविध खेळांचे स्टॉल लावण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी येथे फिट इंडियाचे एक उदाहरण सेट केले. येथे उपस्थित असलेल्या जिमला पंतप्रधानांनी भेट दिली आणि स्वत: जिममध्ये व्यायामही केला. पीएम मोदी सर्वात आधी येथे उपस्थित जिममध्ये पोहोचले आणि मशीन्सचा आढावा घेतला.
(हे ही वाचा: थंडी वाजते म्हणून कुत्र्याने केला हटके जुगाड, हा Viral Video एकदा बघाच!)
त्यांनी बॉडी वेट लॅटपुल मशीनवर (Body Wait latpull machine) व्यायाम केला. यामुळे शरीराचे स्नायू मजबूत होतात. मशीनवर बसल्यानंतर, पीएम मोदींनी सलग १५ वेळा हे मशीन एकामागून एक खेचले.
(हे ही वाचा: शेळीने दिला मानवासारख्या मुलाला जन्म! सोशल मीडियावर फोटो Viral)
(हे ही वाचा: थुंकून तंदूरमध्ये रोटी बनवणाऱ्याचा Video Viral; नेटीझन्सने केला संताप व्यक्त!)
पीएम मोदी नेहमीच देशवासीयांना फिटनेसबाबत आग्रह करत असतात. पीएम मोदींनी २९ ऑगस्ट २०१९ मध्ये फिट इंडिया मिशन लाँच केले.याद्वारे पंतप्रधान मोदींनी देशातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनात फिटनेसचा समावेश करण्याचे आवाहन केले होते.