Police Attacked By Farmers In Protest, Viral Claim: शेतकरी आंदोलनातील अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यावरून अनेक गटांमध्ये ऑनलाईन वाद सुद्धा सुरु आहे. दरम्यान यातील प्रत्येक व्हिडिओची सत्यता सिद्ध झालेली नाही. अलीकडेच लाइटहाऊस जर्नालिज्मला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडिओ आढळून आला ज्यामध्ये काही लोक पोलिसांवर तलवारीने हल्ला करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. नेमकं यामध्ये किती तथ्य आहे हे आता आपण तपासून पाहणार आहोत.

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Om Prakash ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील समान दाव्यासह हा व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही इन्व्हिड टूल मध्ये हा व्हिडिओ अपलोड करण्यापासून तपासाची सुरुवात केली, यातून आम्हाला बऱ्याच किफ्रेम्स मिळाल्या. या किफ्रेम्स वर आम्ही रिव्हर्स इमेज सर्च केला व व्हिडिओ शोधण्यास सुरुवात केली. आम्हाला या द्वारे इंस्टाग्राम वर अपलोड केलेली एक रील आढळून आली, जी जानेवारी ३१ रोजी अपलोड करण्यात आली होती, शेतकरी आंदोलनाची सुरुवात फेब्रुवारी १३ रोजी झाली त्यामुळे हे स्पष्ट होते की हा व्हिडिओ शेतकरी आंदोलनाचा नाही.

X वर शेअर होत असलेल्या व्हिडिओ वरील एका कमेंट मध्ये हा व्हिडिओ कुठला हे स्पष्ट नमूद करण्यात आले होते.

https://x.com/Ekamz007/status/1760935850131718545?s=20

त्यानंतर कीवर्ड शोधाद्वारे, आम्हाला घटनेबद्दल अनेक बातम्या आढळल्या.

https://english.jagran.com/india/punjab-tarn-taran-tension-erupts-in-after-video-showing-removal-of-bhindranwale-poster-went-viral-10130254

रिपोर्ट मध्ये लिहले होते: भिंद्रनवाले यांच्या पोस्टरसह तंबू हटवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा तरनतारनच्या पाहुविंद गावात ही घटना घडली.

रिपोर्टमध्ये झालेल्या घटनेचा एक स्क्रीनशॉट होता. त्यात असेही नमूद करण्यात आले आहे: दिवंगत शीख जर्नेल सिंग भिंद्रनवाले यांचे पोस्टर कथितपणे “काढून टाकल्याने” पंजाबच्या तरनतारनमधील गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष आणि सदस्यांवर जमावाने हल्ला केला. काठ्या आणि तलवारींनी सज्ज झालेल्या जमावाने समितीच्या अध्यक्षांच्या गाडीवर हल्ला केला होता, त्यात एक पोलीस अधिकारी आणि समितीचे सदस्य जखमी झाले, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. हि बातमी जवळपास एक महिना जुनी होती.

https://www.hindustantimes.com/cities/chandigarh-news/day-after-clash-bhindranwale-s-portrait-installed-at-tarn-taran-gurdwara-s-entrance-101706554147082.html
https://www.hindustantimes.com/cities/chandigarh-news/clash-at-tarn-taran-gurdwara-over-removal-of-bhindranwale-s-poster-101706466160682.html

हे ही वाचा<< काँग्रेसचा खर्च जास्त, तर भाजपा श्रीमंत! २०२२-२३ मध्ये राष्ट्रीय पक्षांनी किती कोटी कमावले? पाहा आकडेवारी

निष्कर्ष: पोलिसांवर लोकांकडून हल्ले होत असल्याचा व्हायरल व्हिडिओ हा अलीकडच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा नाही, तर भिंद्रनवाले यांचे पोस्टर हटवल्याबद्दल तरनतारन गुरुद्वारात झालेल्या घटनेचा आहे. व्हायरल दावा खोटा आहे.