Pune Porsche Accident : पुण्यामध्ये शनिवारी रात्री मद्यपान करून महागड्या पोर्श गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाने रस्त्यावरून जाणाऱ्या बाईकला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता. अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्ट असे मृतांचे नाव आहे. या अपघातानंतर कार चालवणाऱ्या अल्पवयीन (साडेसतरा वर्षे) आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि रविवारी दुपारी त्याला विशेष हॉलिडे कोर्टात हजरही करण्यात आल होते. मात्र तो अल्पवयीन आहे म्हणून न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला. न्यायालयाने, अपघाताबाबात ३०० शब्दांचा निबंध लिहायला लावला. आरोपीने १५ दिवस येरवडा विभागात ट्रॅफिक कॉन्स्टेबलबरोबर वाहतुकीचं नियोजन करावं, या दोन अटीवर त्याला जामीन मंजूर केला होता. याशिवाय पोलिसांनी कुठल्याही प्रकारची मोठी कारवाई केली नव्हती. या घटनेबद्दल सोशल मीडियावर लोक नाराजी व्यक्त करत आहेत. ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याच्या शिक्षेबद्दल सर्वत्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यासह राज्यभरात उमटताना दिसत आहे. या प्रकरणानंतर पुण्यातील एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये तरुणाच्या हातात एक पुणेरी पाटी असल्याचे दिसते ज्यावर असे काही लिहिले आहे ज्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

two wheeler accident
पुणे: फटाक्यांच्या धूरामुळे गंभीर अपघात, दोन दुचाकींची समोरासमोर धडक; अपघातात चौघे जण जखमी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Road Accident van hit scooter smashed into pieces video viral on social media
चूक कोणाची? भरवेगात आला अन् चालत्या स्कूटरचा केला चुरा, अपघाताचा VIDEO पाहून उडेल थरकाप
saras baug pune diwali pahat
“आमच्याकडे सारसबाग आहे!”; काकांचा डान्स अन् तरुणांचा धिंगाणा, पुण्यातील दिवाळी पहाटचा हा व्हिडीओ पाहिलात का?
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
man murdered colleague over dispute on food cooking
जेवण बनवण्यावरून वाद; लोखंडी रॉडनी ११ घाव घालून केली हत्या, पिंपरीतील घटना
Madhya Pradesh Shocker: Pregnant Woman 'Forced' To Clean Blood-Stained Hospital Bed After Husband's Murder In Dindori
इथे माणुसकी मेली! पतीचा गोळीबारात मृत्यू, गरोदर पत्नीला रक्त साफ करण्यास भाग पाडलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा
jahnavi killekar wash mother in law feet and perform pooja
Video : दिवाळीच्या दिवशी जान्हवी किल्लेकरने सासूबाईंसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “खरी लक्ष्मी तुच आहेस…”

हेही वाचा – किळसवाणा प्रकार! चिकन तळण्याच्या जाळीने काढला जातोय गटारातील कचरा, मुंबईच्या हॉटलेमधील धक्कादायक Video Viral

व्हायरल व्हिडीओ pavanwaghulkar या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पुण्यातील विविध भागामध्ये एक तरुण हातात एक पुणेरी पाटी घेऊन उभा असलेला दिसत आहे. अनेक लोक ती पाटी वाचून निघून जात आहेत. व्हिडीओच्या शेवटी पुणेरी पाटीवरील मजकूर दिसतो. “निबंध लिहिलेला कागद गाडीत ठेवून अपघात केला तर चालेल का?” असा मार्मिक प्रश्न लिहिलेला दिसत आहे. न्यायलयाने दिलेल्या शिक्षेवर टिका करणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

३०० शब्दांचा निंबधाचाच उल्लेख करत ‘तीन अडकून सीताराम’चे दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांनीही सोशल मीडियावर मार्मिक पोस्ट शेअर केली होती. “मग आता निबंधात कमी मार्क्स मिळाले म्हणून तुरुंगात घालायचा कायदा तरी आणा… (पुणेप घात)” असं त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे. अनेक जण सोशल मीडियावर या मुद्द्यावरून मार्मिक टिका करताना दिसत आहे.ॉ

हृषिकेश जोशी यांची फेसबुक पोस्ट
हृषिकेश जोशी यांची फेसबुक पोस्ट

हेही वाचा – पुलावरुन कोसळता कोसळता थोडक्यात वाचली बस, थरारक अपघातानंतर दोन पुलांच्या मधोमध अडकलेल्या बसचा Video Viral

दरम्यान, आरोपी मुलाला अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी लोक करत आहेत. दुसरीकडे मृत अश्विनी व अनिशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत अश्विनी वडिलांचा वाढदिवस असल्याने १८ जूनला ती जबलपूरला जाऊन सरप्राईज देणार होती. पण त्याआधीच हा भयंकर अपघात झाला आणि अश्विनीचं निधन झालं अशी माहिती समोर आली आहे. अनिश पुण्यातल्या एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता.अपघाताच्या आधीच तो दुबईला जाऊन आला होता. तसंच त्याची कंपनी त्याला विदेशात पाठवणार होती. त्याचं ते स्वप्न होतं. मात्र त्याचं स्वप्न पूर्ण झालं नाही. दरम्यान, याप्रकरणी समाजमाध्यमं आणि लोकांकडून प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यानंतर गृह मंत्रालय आणि प्रशासन जागं झालं. पुणे पोलिसांनी अपघाताच्या तीन दिवसांनंतर अल्पवयीन आरोपीच्या वडिसांसह बार मालक (ज्या बारमध्ये आरोपीने मद्यप्राशन केलं होतं) आणि मॅनेजरला अटक केली आहे.