लक्झरी फॅशन जगतात नेहमीच काहीतरी वेगळं, विचित्र आणि भडक पाहायला मिळतं. मात्र, या वेगळेपणाचा अतिरेक झाला की सर्वसामान्यांचाही मनातील संताप बाहेर येतो. प्रसिद्ध इटालियन फॅशन ब्रँड ‘प्राडा’ (Prada) सध्या अशाच कारणामुळे चर्चेत आलं आहे. कारण, या ब्रँडने आता एक साधासुधा सेफ्टी पिन तब्बल ३८ हजार रुपयांना विक्रीसाठी ठेवला आहे.

होय, तुम्ही बरोबर ऐकलं — साधा मेटल सेफ्टी पिन! तीच पीन जी महिला साडीचा पदर किंवा ओढणी सावरण्यासाठी वापरतात. आपल्याकडे हे उत्पादन कित्येक वर्षांपासून रोज वापरले जाते पण प्राडा सारखा मोठा ब्रँड स्वत:चे उत्पादन असल्याचा दावा करत अत्यंत महागड्या किंमतीत विकत आहे. एवढंच नाही त्यांना या सेफ्टी पीनला नाव “गोल्ड कलर मेटल ब्रोच” असे ठेवले आहे आणि त्याची किंमत आहे ३८० युरो, म्हणजेच जवळपास ₹३८,६६२ इतकी आहे.

‘प्राडा’चा सेफ्टी पिन म्हणजे नेमकं काय? (What exactly is a Prada safety pin?)

ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर हा “मेटल ब्रोच” अतिशय साध्या डिझाइनमध्ये दाखवण्यात आला आहे. उत्पादनाच्या वर्णनात लिहिलंय, “मिनिमलिस्ट डिझाइनमध्ये तयार केलेला हा मेटल ब्रोच आधुनिक शैली दर्शवतो, ज्यावर ‘प्राडा’चे कोरलेले अक्षर (लोगो) सजवलेले आहे.” म्हणजेच, त्यावर फक्त ‘Prada’ असं कोरलेलं अक्षर आहे आणि बाकी काहीच विशेष वैशिष्ट्य नाही. ना मौल्यवान धातू, ना दुर्मीळ दगड, ना खास कारागिरी.

पण किंमत मात्र — तब्बल ३८ हजार! त्यामुळे सोशल मीडियावर लोकांनी यावर हसत, राग व्यक्त करत, काहींनी तर “हे लक्झरीचं नव्हे, वेडेपणाचं प्रतीक आहे!” असं म्हणत प्राडाची खिल्ली उडवली आहे.

Prada’s ₹38,000 Safety Pin Shocks Indians!
प्राडाने तर हद्दच केली बाई! साडीचा पदर सावरायला ३८ हजारांची ‘सेफ्टी पिन’!

सोशल मीडियावर संतापाची लाट (A wave of anger on social media)

इन्स्टाग्रामवर एका यूजरने या उत्पादनाचा फोटो शेअर करत लिहिलं — “चला, पाहूया प्राडाचा नवा प्रॉडक्ट — सेफ्टी पिन ब्रोच, किंमत $७७५. श्रीमंत लोक काय करतायत आपल्या पैशाचं? जर काही सुचत नसेल तर आम्हाला विचारा, आम्ही सांगू कसं वापरायचं!”

ही पोस्ट काही तासांतच व्हायरल झाली. लोकांनी लक्झरी ब्रँड्सवर श्रीमंतीचं प्रदर्शन आणि वास्तविक जगापासून तुटलेली मानसिकता दाखवल्याचा आरोप केला.

फुलांच्या ब्रोचची किंमतही चक्क ३७ हजार! (The price of a flower brooch is a whopping 37 thousand!)

Prada’s ₹38,000 safety pin goes viral on social media
प्राडाची ३८ हजार रुपयांची सेफ्टी पिन सोशल मीडियावर व्हायरल

प्राडाच्या वेबसाइटवर नजर टाकली असता हे स्पष्ट झालं की ही केवळ एकच वस्तू नाही. ब्रँडकडे “Radzimir आणि Poplin metal flower brooch” नावाने अजून दोन वस्तू आहेत, ज्यांची किंमतही तब्बल ३६० युरो (सुमारे ₹३७,०००) आहे. म्हणजे, फुलाच्या आकाराचा एक छोटा मेटल ब्रोच — आणि किंमत एका सामान्य भारतीयाच्या महिन्याच्या पगाराइतकी!

Prada’s ₹38,000 safety pin goes viral on social media
लक्झरी ब्रँड प्राडाने ३८ हजार रुपये किंमतीची सेफ्टी पिन बाजारात आणली असून भारतीय नेटिझन्सनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

कोल्हापुरी चप्पल प्रकरण अजून विसरलं नाही! (The Kolhapuri chappal case has not been forgotten yet!)

ही पहिली वेळ नाही की प्राडा आपल्या उत्पादनांमुळे वादात अडकला आहे. काही महिन्यांपूर्वीच या ब्रँडने भारतीय कोल्हापुरी चप्पलांसारख्या दिसणाऱ्या सॅंडल्सची विक्री केली होती, आणि त्या सॅंडल्सची किंमत होती जवळपास १.२ लाख रुपये (USD 785).

या उत्पादनात भारताचा कुठेही उल्लेख नव्हता. ते फक्त “Leather Sandals” म्हणून विकले जात होते. मात्र, त्या चप्पलांचा डिझाइन महाराष्ट्रातील पारंपरिक कोल्हापुरी चप्पलांसारखाच होता. यावरून भारतीय डिझायनर्स, कारागीर आणि भारतीयांनी प्राडावर जोरदार टीका केली. सोशल मीडियावर #CulturalAppropriation हा हॅशटॅग ट्रेंड झाला.

Prada kolhapuri Chappal

अनेकांनी सांगितलं की, लक्झरी ब्रँड्स पारंपरिक भारतीय डिझाइन्स आपल्या नावावर विकतात, पण त्यामागच्या कारागिरांचा, त्यांच्या कौशल्याचा आणि संस्कृतीचा उल्लेखही करत नाहीत.

प्राडाची प्रतिक्रिया — उशिरा का होईना, पण मान्यता दिली (Prada’s reaction — late or late, but approved)

वाद वाढल्यानंतर प्राडाने अखेर आपल्या वेबसाइटवरील उत्पादनाचे वर्णन बदलत भारतीय ‘कोल्हापुरी’ वारशाशी साधर्म्य असल्याचं मान्य केलं. ही मान्यता लहान असली तरी, ती भारतीय पारंपरिक कलाकुसरीचं जागतिक स्तरावर महत्त्व अधोरेखित करणारी ठरली.

लक्झरीची मर्यादा कुठे संपते? (Where does the limit of luxury end?)

या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे — लक्झरी म्हणजे नेमकं काय? काहीतरी वेगळं, दुर्मीळ आणि कलात्मक असणं ही लक्झरीची खरी व्याख्या आहे का, की केवळ ब्रँड नेमच सर्व काही ठरवतो?

३८ हजार रुपयांचा “सेफ्टी पिन” आणि १.२ लाख रुपयांच्या “कोल्हापुरीसारख्या सॅंडल्स”नंतर लोकांचा प्रश्न आहे — ब्रँडची किंमत जास्त की वस्तूची किंमत?

भारतीय कारागीरांची खरी ओळख जगाला मिळेल का? (Will the world get the true recognition of Indian artisans?)

प्राडासारख्या ब्रँड्सने भारतीय डिझाइन आणि हस्तकला यांपासून प्रेरणा घेणं हे अभिमानास्पद आहे, पण त्या कलेचं श्रेय देणं तितकंच महत्त्वाचं आहे. भारतीय कोल्हापुरी चप्पल, वारली आर्ट, बंधनी किंवा कांजीवरम — ही केवळ कला नाही, तर हजारो वर्षांचा परंपरेचा वारसा आहे.

फॅशन जगतातील या प्रकारच्या वादांमुळे किमान एक सकारात्मक बदल होतोय — लोक आता या प्रश्नांची विचारणा करत आहेत, आणि लक्झरी ब्रँड्सनाही त्यांच्या “डिझाइनच्या मूळ प्रेरणेबद्दल” पारदर्शक राहावं लागतं.