Viral video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. एवढंच नाहीतर रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळेही अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. दरम्यान पुण्यात असाच एक अपघात झाला त्यामध्ये पुण्याच्या नऱ्हे भागात ड्रेनेजमध्ये दुचाकी स्वार पडला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

पुणे महानगरपालिकेतील समाविष्ट असलेल्या नऱ्हे गावातील रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेजची काम सुरू आहेत. ड्रेनेज काम सुरू असल्याने रस्ते काही ठिकाणी बंद केले आहेत. या भागात शैक्षणिक संस्था आहे, तसेच खासगी कंपन्या आहेत. विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने या परिसरातून जातात. मात्र रस्त्याच्या कामांमुळे सर्वांनाच वाहतुक कोंडी, प्रदुषणाला सामोरे जावं लागतंय. अशातच आता हा अपघात घडला आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ड्रेनेज काम सुरू असल्याने रस्ते काही ठिकाणी बंद केल्यानंतर दुचाकीस्वार मिळेल त्या रस्त्याने दुचाकी वरून रस्ता शोधत बाहेर पडत असतानाच दुचाकी गाडी उलटली आणि गाडी सहित ड्रेनेज मध्ये पडला. किरकोळ जखमी झालेल्या दुचाकी स्वराला आणि गाडी स्थानिक नागरिक यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नऱ्हेतील ड्रेनेज लाईनचे काम निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे ठप्प होते. आता काम सुरू झाला आहे मात्र वाहतूक कोंडी आणि रस्ते बंद असल्यामुळे नागरिक मिळेल त्या रस्त्याने बाहेर पडत आहेत.त्यातच हा अपघात झाला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की

जड वाहनांना बंदी

वाढलेले गंभीर अपघात रोखण्यासाठी व वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्ग परिसरातील भूमकर चौक भुयारी मार्ग ते नऱ्हे गावातील श्री कंट्रोल चौकदरम्यान जड वाहनांना बंदी घातली आहे.

वाहने लावण्यास मनाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंहगड रस्त्यावरील मॅकडोनाल्डस् उपहारगृहसमोर दोन्ही बाजूस ५० मीटर अंतरापर्यंत सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांच्या काही हरकती किंवा सूचना असल्यास वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालय, येरवडा, गोल्फ क्लब रस्ता येथे लेखी स्वरुपात कळावाव्यात, असे आवाहन पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे