Pune viral video: महाराष्ट्रात मराठी भाषेवरील वाद सतत वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, हल्ली ही प्रकरणं वाढत आहेत. अशातच पुण्यातून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जिथं कोंथिंबीर खरेदी करताना पुणेरी ग्राहकाचा दुकानदारासोबत वाद झाला. ग्राहकाने मराठीत बोलायला सांगितले असता, दुकानदार म्हणाला, “आम्ही मारवाडी आहोत, आम्ही मराठीत का बोलू?” याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गेल्या काही महिन्यापूर्वी कल्याणच्या हायप्रोफाईल सोसायटी मराठी विरुद्ध अमराठी वादामध्ये तुंबळ हाणामारी प्रकरणं झालं होत. हे प्रकरणं विधानसभेत गाजलं होतं. मागील काही काळात अशी अनेक प्रकरणं मुंबई, ठाणे, कल्याण , डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये मराठी विरुद्ध परप्रांतीय असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले.आता पुण्यातूनही असंच एक प्रकरण समोर आलं आहे.
ही घटना पुण्यात घडली आहे.व्हिडीओमध्ये दुकानदार आणि ग्राहक यांच्यात मराठी भाषेवरून झालेला वाद स्पष्ट दिसतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मराठी ग्राहक म्हणाला, “मराठीमध्ये बोला,” यावर दुकानदार महिला म्हणाली, “आम्ही मारवाडी आहोत, आम्हाला मराठी येत नाही, त्यामुळे आम्ही मराठी बोलणार नाही.” ग्राहकाने यावर आक्षेप घेतला आणि सांगितले की, “जर तुम्ही महाराष्ट्रात राहता, तर तुम्हाला मराठी येायलाच पाहिजे.” यावेळी दुकानात महिलेसोबत असलेल्या तिच्या मुलाने कोणाला तरी फोन करून भिती दाखवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे वाद आणखी वाढला. मराठी ग्राहकाने त्याला थेट आव्हान दिले, “ज्याला बोलवायचंय त्याला बोलव, मी घाबरणार नाही.”
मात्र नंतर व्हिडीओच्या शेवटी समजते की, हा संपूर्ण वाद कोथिंबीरच्या दर्जावरून झाला होता. खराब झालेली कोथिंबीर ३० रुपयांना विकली जात होती. पण हळूहळू हा वाद हिंदी विरुद्ध मराठी या स्वरूपात वाढत गेला. हा व्हिडीओ बघा आणि तुम्हीच सांगा यामध्ये चूक कुणाची?
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.