Pune Video : पुणे असे शहर आहे जे प्रत्येकाला आवडतात. या शहरात येणारी प्रत्येक नवीन व्यक्ती पुण्याच्या प्रेमात पडते. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, पुणेरी पाट्या, पुणेरी भाषा, पुण्याची खाद्यसंस्कृती एवढंच काय तर येथील शिक्षण आणि इतर सोयीसुविधा अनेकांना आकर्षित करतात. पुण्यात येणारी व्यक्ती सुरुवातीला पुण्याच्या काही खास लोकप्रिय ठिकाणी भेट देते. तुम्ही कधी पुण्याला आला आहात का ? आणि तुम्ही कधी पुण्यातील जुना बाजारला भेट दिली आहे का? हो, जुना बाजार. हा एक असा बाजार आहे तिथे तुम्हाला अनेक जुन्या वस्तू मिळतील. या बाजारात एकदा आल्यावर तुम्ही खरेदी केल्याशिवाय परत जाणार नाही. सध्या सोशल मीडियावर या जुन्या बाजाराचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक पितळीचे आणि तांब्याची भांडी दाखवली आहेत. त्यात टिफिन बॉक्स, जुनी नाणी, घरगुती वस्तू, स्वयंपाक घरातील भांडी, जुने रेडिओ, अवजार, कपडे, शूज, एवढेच काय तर हस्तकला आणि पेंटिंग पर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू सुद्धा या व्हिडिओमध्ये दाखवल्यात आहेत. व्हिडिओ पाहून तुम्हाला या जुन्या बाजाराला एकदा भेट द्यावीशी वाटेल. या बाजाराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सर्व वस्तू येथे अत्यंत कमी दरात मिळतात. असं म्हणतात हा बाजार २५० वर्षांहून अधिक जुना आहे.

हेही वाचा : “मला फसवलं जातय…” अपघाताच्या Viral Video वर रजत दलालने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला, “माझ्याविरोधात कट…”

पाहा व्हायरल व्हिडीओ

महिला असो वा पुरुष, दोघांनाही शॉपिंग करायला आवडते. काही लोकांना ७०-८० च्या काळातील जुन्या वस्तूंचा संग्रह करायला आवडतो. अशा लोकांसाठी हा बाजार उत्तम पर्याय आहे. अगदी कमी दरात तुम्ही या वस्तू खरेदी करू शकतात.

हेही वाचा : गणेशभक्तांसाठी मोठी बातमी! चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं उद्या आगमन, पण मंडळाच्या अध्यक्षांनी केलं ‘हे’ मोठं आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

xplorepunecity या इन्स्टाग्राम अकाउंट करून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जुना बाजारचे सौंदर्य, घोरपडे रोड” या व्हिडिओवर अनेक युजर्सने प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जुना संसार” तर एका युजरने आपला अनुभव सांगितला आहे, ती लिहिते, “हा फक्त नावाला जुना बाजार आहे. इथे पितळी वस्तूंच्या किंमती नवीन पेक्षा जास्त असतात. स्वानुभव.” आणखी एका युजरने लिहिलेय, ” लय भारी आपले पुणे शहर”