आजकाल कॉलेज फेस्ट, स्पर्धा आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर डान्स व्हिडीओज खूप चर्चेत येत आहेत, कारण विद्यार्थी आपला क्रिएटिव्ह आणि एनर्जीपूर्ण टॅलेंट सहजतेने शेअर करत आहेत. छोट्या क्लिप्समध्ये दमदार डान्स स्टेप्स, भरभरून उर्जा आणि ट्रेंडिंग गाण्यांचा वापर केला आहे ज्यामुळे तो कमी वेळात व्हिडीओ लगेचच व्हायरल होतात. सध्या “दुपट्टा मेरा”, “जिगर का तुकडा”, “शॅकी शॅकी” सारखी गाणी इंस्टाग्राम आणि एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर देखील जोरदार चर्चेत आहेत. यामुळे कॉलेज फेस्टमधील डान्स कल्चर सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा भाग बनला आहे.

पुण्यातील एका महाविद्यालयातल्या कार्यक्रमामध्ये एक तरुणाने सादर केलेल्या डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रितेश उदावंत या विद्यार्थ्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला असून, “फर्ग्युसनमध्ये मनापासून नाचलो, अशा कॅप्शनसह तो व्हायरल झाला आहे. सध्या या व्हिडीओला ५४३००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हिडीओमध्ये रितेशने“दुपट्टा मेरा”, “जिगर का तुकडा”, “शॅकी शॅकी” या तीन गाण्यांवर रिमिक्स डान्स करत प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. हॉलमध्ये प्रेक्षकांच्या टाळ्या आणि उत्साहाचे वातावरण पाहून परफॉर्मन्स किती दमदार आहे हे सहज कळते.

सोशल मीडियावर चाहत्यांनी रितेशच्या परफॉर्मन्सला खूप कौतुक केले. एका युजरने लिहिले, “काय नाचला राव,” तर दुसऱ्या युजरने म्हटले, “भावा, तु अफलातून डान्स करून अनेक तरुणींना लाजवले आहे.” आणखी एका युजरने साधेपणाने म्हटले, तो आला, त्याने जिंकले.”

यापूर्वीही कॉलेज फेस्टमधील डान्स व्हिडीओजने सोशल मीडियावर हॉट चर्चा घेतली आहे. बंगळुरूतील विद्यार्थ्यांचा “अंगारो” पुष्मा २मधील गाण्यावरचा डान्सही व्हायरल झाला होता.