scorecardresearch

मुंबईच्या लोकल ट्रेनमधली ‘पुष्पा’ स्टाईल तुम्ही पाहिलीय का? श्रीवल्ली हुक स्टेपचा रिक्रिएट VIRAL VIDEO एकदा पाहाच

सध्या जिकडे तिकडे सर्वांवर ‘पुष्पा’ फिवर चढलेला आहे. सगळीकडे सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची चर्चा रंगलीय. याच चित्रपटातील ‘पुष्पा’ स्टाईल मुंबई लोकल ट्रेनमध्ये कशी असते, हे दाखवणारा हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

Pushpa-Style-In-Mumbai-Local-Train
(Photo: Instagram/ dhirajjjjj_)

सध्या जिकडे तिकडे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा होत आहे. सामान्यांपासून ते बॉलिवूडमधील बड्या बड्या सेलिब्रिटींपर्यंत सर्वांवर पुष्पाचा फिवर चढलेला दिसून येत आहे. या चित्रपटाने आपली जादू बॉक्स ऑफिसवर सुद्धा पसरवली आहे. या चित्रपटाच्या गाण्यांसोबत सुपरस्टार अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ स्टाईल सुद्धा बरीच चर्चेत आलीय. तुम्ही जर सोशल मीडियावर सक्रिय असाल तर मोबाईल चाळताना पुष्पा स्टाईलमधले अनेक रील्सचे व्हिडीओ एकदा तरी तुमच्या नजरेस पडले असतील. असाच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. सोशल मीडियावर चर्चेत आलेली ‘पुष्पा’ स्टाईल मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कशी असेल ? याची तुम्ही कधी कल्पना केलीय का? ही कल्पना प्रत्यक्षात उतरवून श्रीवल्ली हुक स्टेपचा रिक्रिएट व्हिडीओ तयार करण्यात आलाय. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेत आहेत.

‘पुष्पा द राईज’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर सर्वांवर दिवसेंदिवस ‘पुष्पा’ फिवर चढताना दिसून येतोय. सुपरस्टार अल्लू अर्जुनचे प्रत्येक फॅन्स त्याच्या या चित्रपटातली हुक स्टेज कॉपी करत याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसून येत आहेत. यापैकीच एक व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आलाय. या व्हिडीओमध्ये एका अस्सल मुंबईकर तरूणाने लोकल ट्रेनमधली ‘पुष्पा’ स्टाईल या व्हिडीओमध्ये दाखवलीय. या व्हिडीओमध्ये मुलगा मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करताना दिसून येतोय. सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातल्या स्टाईलला अगदी हुबेहूब कॉपी करत तो लोकलमध्ये चढण्यासाठी तो आपला प्रवास करताना दिसून येतोय.

आणखी वाचा : स्वतःचा व्हिडीओ बघताच माकडांची मजेशीर रिअ‍ॅक्शन; VIRAL VIDEO पाहून खळखळून हसाल

हा मजेदार व्हिडीओ कंटेट क्रिएटर धीरज सनप याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुंबईकर मुंबई लोकल ट्रेनमध्ये कसा जातो हे दाखवण्यासाठी या मुलाने गंमतीने श्रीवल्ली हुक स्टेप वापरत प्रवास केलाय. हुबेहूब पुष्पा स्टाईल प्रमाणे रस्त्यावरून चालत तो गर्दीत आपली वाट मोकळी करता दिसून येतोय. प्लॅटफॉर्मवरील पायऱ्या चढण्यापासून ते लोकलमध्ये सीट मिळवण्यापर्यंत हा मुलगा सेम टू सेस पुष्पा स्टाईलमध्येच चालताना दिसून येतोय.

आणखी वाचा : याला म्हणतात कर्माचे फळ! उंटाला त्रास देत होता हा माणूस आणि…पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : “तू दारू का पितो?” असा प्रश्न केल्यानंतर या व्यक्तीने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्ही पोट धरून हसाल!

प्रत्येक जण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया ग्रूपवर पुढे शेअर करत लोकल ट्रेनमधली पुष्पा स्टाईल लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. बघता बघता हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ७६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ‘Pushpa In Locals’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअऱ करण्यात आलाय.

आणखी वाचा : ‘मेरा पिया घर आया’ म्हणत लग्नात नवरीने मैत्रिणीसोबत केली जबरदस्त एन्ट्री, धमाकेदार डान्स पाहून सारेच जण चकित

अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भुमिकेत असणाऱ्या ‘पुष्पा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय आणि त्यामुळेच या चित्रपटाची भुरळ सर्वत्र दिसत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटी रूपयांची कमाई केलीय. या चित्रपटाच्या पहिल्या पार्टनंतर आता दुसऱ्या पार्टसाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pushpa allu arjun srivalli hook step mumbai local train hilarious video viral instagram prp

ताज्या बातम्या