अल्लू अर्जुनच्या पुष्पा: द राइज (Pushpa The Rise) या चित्रपटाची क्रेझ संपण्याचे नाव घेत नाही आहे. ‘पुष्पा’ चित्रपटातील गाण्याची हुक स्टेप अजूनही खूप ट्रेंडमध्ये आहे. आता ‘पुष्पा’चा फिवर प्राण्यांनाही चढू लागला आहे. हा व्हिडीओ पाहून अंदाज बांधता येईल की, मानव आता प्राण्यांवरही ‘पुष्पा’ची जादू कशी झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक गोरिला श्रीवल्ली गाण्याच्या हुकस्टेप करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही एका मिनिटासाठी थक्क व्हाल. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाहून युजर्सनी आपल्या प्रतिक्रियांचा पाऊस पाडला.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या गाण्यांवर आणि डायलॉगवर नेटीझन्स रील बनवत आहेत, ज्यामध्ये लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच पाहायला मिळत आहेत. आता या यादीत प्राण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या व्हायरल झालालेल्या या व्हिडीओमध्ये, एक गोरिला सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यावर हुकस्टेप करताना दिसत आहे.

(हे ही वाचा: दगडावर चढण्यासाठी कासवाच्या मित्राने ‘अशी’ केली मदत; मैत्री दर्शवणारा सुंदर Video Viral)

(हे ही वाचा: एखाद्या खेळण्याप्रमाणे ही चिमुरडी खेळतीये सापाशी! आश्चर्यचकित करणारा Video Viral)

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ एका प्राणीसंग्रहालयाचा आहे, ज्यामध्ये प्रेक्षकांना पाहून एक गोरिला त्याच्या आवारात फिरत असताना पुढे येतो. बंदिस्ताच्या सीमेवर येताच गोरिला शिडीवर उभा राहून तिरपे चालायला लागतो. गोरिल्लाची ही हालचाल तिथे उपस्थित लोकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. या व्हिडीओला अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटातील श्रीवल्ली गाण लावून एडीट करण्यात आला आहे.

(हे ही वाचा: एका अपघातात मुलाने दोनदा मृत्यूला दिला चकवा! अंगावर काटा आणणारा Video Viral)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

गोरिलाच्या हुकस्टेप नेटीझन्सला खूप आवडल्या आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यासोबतच या व्हिडीओला ११ लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडीओ पाहून यूजर्स उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘हा फिवर करोनापेक्षा जास्त भीतीदायक आहे.’