उत्तर प्रदेशची निवडणूक वेगवेगळ्या कारणाने चर्चेचा विषय बनली आहे. वडिलांशी दोन हात करत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काँग्रेसची हातमिळणी केली. त्यामुळे निवडणुकांच्या रिंगणात उतरलेली ही जय वीरुच्या जोडी काय करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशची सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. आपण एकाच सायकलचे दोन चाक आहोत किंवा गंगा यमुना आहोत असेही जाहिरपणे या दोघांनी सांगितले त्यामुळे हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला . त्यातून या जोडीवर सोशल मीडियावर पुन्हा खिल्ली उडवली जात आहे.

viral : म्हणून राहुल गांधी घाबरले

त्याचे झाले असे की राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने अल्पसंख्यांकांसाठी काय योजना आहेत? असा सवाल केला. बरं हा सवाल करत असताना त्याने आपली ओळख मी युपीच्या नंबर वन चॅनेलचा प्रतिनीधी असल्याचे करुन दिली. राहुल यांना ही बाब अशी काही खटकली की ‘नंबर वन’वरून त्यांनी भाजपवर टीका करायला सुरुवात केली आता राहुल गांधीच्या या उत्तराने अखिलेश यांनाही हसू आवरेना. पण या टीका करण्याच्या नादात राहुल गांधीं या पत्रकाराने प्रश्न काय विचारला हेच विसरले. त्यामुळे त्यांचा वार त्यांच्यावरच उलटला आणि पुन्हा एकदा राहुल गांधीवर विनोद करण्यासाठी नेटीझन्सना आयता मुद्दा मिळाला. यावर पीईंग शार्टने एक व्हिडिओ बनवला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

VIRAL: फाटका कुर्ता घालतो म्हणणाऱ्या राहुल गांधींची सोशल मीडियावर उडवली खिल्ली