गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने कहर केला आहे. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकसह अनेक ठिकाणी सातत्यानेवादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे तर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर पाणीच पाणी साचले आहे. दरम्यान अशा परिस्थितीमध्ये मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. मध्य प्रदेशातील सागर मुसळधार पाऊस अन् वादळी वाऱ्यामुळे निर्माण झालेल्या स्थिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान जोरदार वाऱ्यामुळे एका कच्च्या घराचे छत उडून गेल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे या घराच्या छताबरोबर दोन चिमुकलेही उडाल्याचे दिसत आहे. या भयावह आणि हृदयद्रावक घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये एक व्यक्ती मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचे दृश्य कैद करत आहे. दरम्यान जसजसा कॅमेरा वळतो तसे शेजारी घर दिसते. वादळी वाऱ्यामध्ये अचानक या घराचे छत उडून जाताना दिसत आहे. दरम्यान घरामध्ये असलेल्या दोन्ही मुलांना छतावर धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते कारण घराच्या छताबरोबर दोन्ही मुलेही उडून जात असल्याचे दिसत आहे. दोन्ही मुले छताबरोबर बाहेर फेकले गेले. या घटनेत दोघेही जखमी झाले.
ही धक्कादायक घटना एका व्हिडिओमध्ये कैद झाली आहे जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर अनेक कमेंट्स आल्या आहेत ज्यात त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि दयेसाठी प्रार्थना करण्यात आली आहे.
ही घटना गौरा खुर्द गावात घडली आणि ते घर अमोल नागवंशी यांचे होते.
व्हिडिओ पाहा
व्हिडिओमध्ये, ज्वाला आणि सुनील ही दोन मुले त्यांच्या घराचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अचानक, जोरदार वाऱ्याने कच्चा घराचे छत उडून जाते आणि मुलांनाही बरोबरघेऊन जाते.
मुलांना किरकोळ दुखापत झाली.
मुलांना किरकोळ दुखापत झाली पण त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांचे म्हणणे आहे की,”ते आता धोक्याबाहेर आहेत आणि त्यांना योग्य वैद्यकीय सेवा मिळत आहे.”
या घटनेवरून असे दिसून येते की, हवामान किती धोकादायक असू शकते. गेल्या काही दिवसांत मध्य प्रदेशातील २० हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत आहेत, ज्यामुळे घरांचे नुकसान झाले आहे आणि दैनंदिन जीवनावर परिणाम झाला आहे.
प्रशासनाने अशा घटना टाळण्यासाठी लोकांना वादळी वारे आणि मुसळधार पावसामध्ये घरामध्ये राहण्याची सूचना केली आहे