Girl Playing Cricket Viral Video : दक्षिण आफ्रिकेत महिला टी-२० विश्वचषकाचा थरार सुरु झाल्यापासून एकाहून एक जबरदस्त सामने पाहायला मिळत आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्या सामन्यातच पाकिस्तानला धूळ चारली. त्यानंत काल बुधवारी झालेल्या वेस्ट इंडिजच्या महिला क्रिकेट संघाचाही भारताने दारुण पराभव केला. त्यामुळे भारतीय महिला खेळाडूंवर जगभरातून स्तुतीसुमने उधळली जात आहेत. महिलांमध्ये क्रिकेट खेळण्याची अप्रतिम कला दिवसेंदिवस इतर तरुणींनाही प्रेरणा देत आहे. कारण राजस्थानच्या एका तरुणीचा क्रिकेट खेळतानाच जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मैदानात चौफेर फटकेबाजी करुन गोलंदाजांचा धुव्वा उडवणाऱ्या या तरुणीनं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे तरुणीच्या आक्रमक फलंदाजीची ‘गॉड ऑफ क्रिकेट’ सचिन तेंडुलकरलाही भुरळ पडली आहे. सचिनने राजस्थानच्या बारमेर येथील तरुणीचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे.

मैदानात काही मुलांसोबत ही मुलगी क्रिकेट खेळत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. गोलंदाजांनी फेकलेल्या चेंडुवर महिला खेळाडू एकापाठोपाठ एक षटकार ठोकत असल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे समोरून येणाऱ्या चेंडूचा अचूक अंदाज घेऊन जबरदस्त फुटवर्क करून या मुलीने गोलंदाजांचा धुव्वा उडवल्याचंही या व्हिडीओत दिसत आहे. पायावर फेकलेल्या चेंडूवरही मोठा फटका मारून तरुणीने क्रिकेट मैदान गाजवलं आहे. या मुलीची क्रिकेट खेळण्याची शैली पाहून सचिन तेंडुलकरही इम्प्रेस झाला आहे. सचिनने या मुलीचा ट्वीटरवर व्हिडीओ शेअर करत सुंदर कॅप्शनही दिलं आहे. “कालच तर लिलाव झाला…आणि आज सामनाही सुरु? खूप छान..खरंच तुझी फलंदाजी पाहून आनंद झाला.

नक्की वाचा – बापरे! घराच्या सिलिंगमध्ये लपले होते तीन मोठे साप, शेपटी दिसली अन् सर्वांची झाली पळापळ, Video व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रेंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनीही हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, “अप्रतिम फलंदाजी! मैदानात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या बारमेरच्या या तरुणीचा व्हिडीओ पाहा. भविष्यातील चॅम्पियनचं एक जबरदस्त उदाहरण. व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सुंदर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ही मुलगी सूर्यकुमार यादवसारखी फलंदाजी करत असल्याचं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने एका नेटकऱ्याने म्हटलं, “फिमेल व्हर्जन ऑफ स्काय”. अन्य एक नेटकरी म्हणाला, मी १०० डॉलरची पैंज लावतो, ती मुलगी इंडिया खेळणार आणि सुपरस्टार होणार.