Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक चिपळूणमधला लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्हाला जर गाडी चालवता ये नसेल तर धाडस करु नका हे समजतं. संभाजीनगरमधल्या अपघाताची पुनरावृत्ती याठिकाणी झाली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

संभाजीनगरच्या अपघाताची पुनरावृत्ती

या व्हिडीओमध्ये एक धडा मिळतो तो म्हणजे, गाडी चालवायला येत नसताना गाडी चालवणं किती महागात पडू शकतं हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. गाडी शिकताना योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला व्यवस्थित गाडी चालवता येत नाहीये. त्यामुळे गाडी अनियंत्रीत होते आणि रस्त्यावर भीषण अपघात होतो. यावेळी चालकाला नसतं धाडस अंगलट आलं आहे, चालकाची एक चूक अनेकांच्या जीवावर बेतली आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीवर ही गाडी आदळते तसचे एका व्यक्तीलाही ठोकते. ही गाडी गोल गोल फिरुन पुन्हा गाडीवर जाऊन धडकते.

संभाजीनगरमध्येही काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. यामध्ये, कार चालवताना रिव्हर्स गिअर पडून अॅक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन खाली कोसळली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर कार दरीत कोसळल्यानंतर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला होता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ताम्हिणी घाटात बाईक घेऊन जाण्याआधी ‘हा’ VIDEO पाहा; रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाड्यांचं काय झालं बघाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर roadsafetycontent या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत हजारो लाइक्स आणि व्ह्यूज गेले असून नेटकरी व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं कमेंट केली आहे की, चारही बाजूला लक्ष दिलं पाहिजे. तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये केलीय की, “यामध्ये यांच्या चुकांमुळे इतर लोकांचे निष्पाप बळी जातात”