Road Accident Video: सध्या रस्ते अपघातांचं प्रमाण खूप वाढत चाललंय. त्यामधले काही अपघात हे वाहनचालकांच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. तसंच या अपघातांची कारणं वेगवेगळी असू शकतात.

गाडी चालवताना नेहमी नियमांचं पालन करावं, हेल्मेट घालावं, फोनचा वापर करू नये, अशा सुरक्षिततेच्या सूचना अनेकदा देऊनही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात.

एक अपघात आपल्याबरोबरच दुसऱ्याचं आयुष्यदेखील संपवू शकतो, हेदेखील आजकाल अनेकांना कळत नाही. यात कोणाचं नशीब चांगलं असेल तर तो वाचतो, नाहीतर असे भयंकर अपघात अनेकांचे जीवच घेतात. सध्या एक असाच भयंकर अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका स्कूल बसने तब्बल ८ वाहनांना धडक दिली. नेमकं काय घडलं जाणून घेऊ या…

स्कूल बसचा अपघात (School Bus Accident Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा धक्कादायक व्हिडीओ पाहून तुम्हालाही घाम फुटेल. अपघाताचा हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका रस्त्यावर सिग्नल लागल्यामुळे वाहनांची रांगच्या रांग लागली आहे. तेवढ्यात मागून भरवेगात एक स्कूल बस येते आणि ८ वाहनांना चिरडते. यात मोठ्या प्रमाणात टू व्हिलरचं नुकसान झाल्याचं दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @primezewsmarathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ३ लाखांच्या वर व्ह्यूज आले आहेत. तसंच ब्रेक फेल झाले अन् स्कूल बसने सिग्नलवर थांबलेल्या तब्बल ८ गाड्यांना चिरडले, भयाण दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. दरम्यान ही घटना नेमकी कुठे घडलीय हे अद्याप कळू शकले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया (Accident Shocking Video)

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “स्कूल बस आणि ब्रेक फेल म्हणजे गाडीवाला मुलांच्या आणि जनतेच्या दोघांच्या जिवाशी खेळतोय शाळेतील लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे गाड्या कंडीशन मध्ये आहे का नाही”, तर दुसऱ्याने “हँड ब्रेकचा वापर करून गिअर कमी करून गाडी कंट्रोल करता आली असती आणि निष्पाप लोकांचा जीव वाचू शकला असता.” अशी कमेंट केली. “शाळेतील मुलांच्या जीवाशी खेळ” अशी कमेंट एकाने केली.