चोरी, दरोडा याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कुठे रस्त्याने चालता फिरताना डल्ला मारला, कुठे दुकान फोडलं, कुठे बँक लुटली अशी एक ना दोन कितीतरी प्रकरणं आहेत. कोणत्याही देशाच्या सरकारचे प्राधान्य असते की, तेथील जनतेला सुरक्षित ठेवणे. पण, सध्या पाकिस्तानातील दरोड्याचा असा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो पाहून सर्व जण हैराण झाले आहेत.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तेथील गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही असे वाटते. काही दरोडेखोर दिवसाढवळ्या एका व्यक्तीला लुटत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाकिस्तानचा असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानची आर्थिक अवस्था दिवसेंदिवस डबघाईला जात आहे. सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे काही लोक अशा चुकीच्या मार्गाचा अवलंब करताना दिसतात. या व्हिडीओमध्ये काय दाखवलं गेलं आहे, हे जाणून घेऊया…

(हे ही वाचा : आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या तरुणींनी केली कबाबची चोरी; दुकानदाराने मग केले असे काही की…, पाहा Video)

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दाखवल्यानुसार, एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला बाईक पार्क केल्यानंतर तिथे बसून फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसत आहे. तेवढ्यात दुचाकीवर बसलेले दोन दरोडेखोर तेथे येतात आणि त्याच्याजवळ थांबतात. यानंतर एक दरोडेखोर त्याला बंदूकीचा धाक दाखवतो, जे पाहून तो माणूस घाबरतो. यानंतर दुसरा दरोडेखोर त्याच्याकडील सर्व माल घेऊन जातो. एवढेच नाही तर त्या व्यक्तीची दुचाकीही हिसकावून घेतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओ येथे पाहा

@gharkekalesh नावाच्या अकाउंटने हा व्हिडीओ X (पूर्वी ट्विटर) वर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना, “पाकिस्तानमधील सार्वजनिक रस्त्यावर दरोडा” असे कॅप्शन लिहिले आहे. वृत्त लिहिपर्यंत हा व्हिडीओ ५.९ दशलक्ष लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, “व्यक्तीला फक्त स्वतःला वाचवायचे होते.” दुसऱ्या युजरने लिहिले, “हे पाकिस्तानचे रोजचे दृश्य आहे.” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “ते दिवसाढवळ्या लुटमार करत आहेत.” अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.