सोशल मीडियावर दररोज अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये लहान मुलांच्या प्राण्यांच्या आणि विविध पक्ष्यांच्या व्हिडीओचा समावेश असतो. सध्या अशाच एका कोंबड्याचा गमतीशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे तो पाहून अनेकांना हसू आवरण कठीण झालं आहे. व्हायरल व्हिडीओमधील कोंबडा मागील जन्मी नक्कीच मिलिटरीमध्ये कामाला असावा अशा कमेंट नेटकरी करत आहेत.

कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक कोंबडी सैनिकांच्या परेडची हुबेहुब नक्कल करताना दिसत आहे. सैनिकांची नक्कल करणारा कोंबडा पाहून तुम्हालाही हसायला आल्याशिवाय राहणार नाही. शिवाय हा कोंबडा सैनिकांची नक्कल कसा करु शकतो असा प्रश्नही पडेल. हा व्हिडिओ पाहून कोंबडाही अशा पद्धतीने परेड करू शकतो यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.

Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Perfect Brush For Healthy Teeth Why Adults Shall Use Kids Tooth Brush
तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासह ‘या’ फायद्यांसाठी तुम्हीही वापरायला हवा लहान मुलांचा टूथब्रश; डॉक्टर काय सांगतात?
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..

हेही पाहा- ‘रिव्हर्स ब्रिज’वरुन जाणारी वाहने अचानक होतात पाण्यात गायब? व्हायरल Video पाहून तुम्हीही थक्क व्हाल

कारण याआधी आपण कुत्रा, मांजर अशा पाळीव प्राण्यांनी किंवा पोपट, कबूतर अशा पक्ष्यांनी माणसांची नक्कल केल्याचं अनेकदा पाहिले आहे. पण कोंबडा माणसांची हुबेहुब नक्कल केल्याचं पाहण्यात आलेलं नाही. त्यामुळे कोंबड्याने माणसाची नक्कल केल्याची ही पहिलीच वेळ असल्याचंही नेटकरी म्हणत आहेत.

हेही पाहा- ‘Flipkart’ला निष्काळजीपणा भोवला! १२,४९९ रुपयांचा मोबाईल न दिल्याने महिलेला द्यावे लागले ४२ हजार

हा कोंबड्याचा हा मजेशीर व्हिडीओ @ViralPosts5 नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, काही मिलिटरीमधील काही सैनिक रस्त्यावर परेड करताना दिसत आहेत. हे सैनिर ज्या पद्धतीने परेड करत आहेत तशीच परेड रस्त्याच्या कडेला उभा असलेला कोंबडा करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना चांगलाच आवडला असून शेअर केल्यापासून आतापर्यंत ५४ हजारांहून अधिक तो वेळा पाहिला गेला आहे. तर या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यांने ‘आम्हाला हसवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद’ म्हटलं आहे. तर आणखी एका नेटकऱ्याने ‘कोंबड्याच्या डान्सची नवीन स्टेप निर्माण झाल्याचं म्हटलं आहे.