जाहिरात हे क्षेत्र असं आहे की जिथे आपले उत्पादन खपवण्यासाठी कंपन्या भन्नाट ऑफर्स देतात आणि लोक त्याचा हवा तसा फायदा घेतात. असंच काहीसं झालं रशियामध्ये. येथील सामारा प्रदेशातील ओल्वी गॅस स्टेशनने अशीच काहीशी भन्नाट जाहिरात केली. जो कोणी बिकीनीमध्ये येईल त्याला मोफत इंधन देण्यात येईल असं या गॅस स्टेशनने जाहीर केलं. असं केल्याने महिला चालक मोठ्या प्रमाणात गॅस स्टेशनवर येतील अशी कंपनीची अपेक्षा होती. मात्र झालं त्याच्या अगदी उलट आणि अनपेक्षित. पुरुषांनीच या संधीचा फायदा घेतला तो ही चक्क बिकीनी घालून.

ओल्वी गॅस स्टेशनने अवघ्या तीन तासांसाठी ही ऑफर ठेवली होती. याचा फयदा केवळ महिलांना होईल असं अपेक्षित असताना गॅस स्टेशनवर महिलांइतकीच पुरुषांचीही रांग लागली. या रांगेत सर्व पुरुष चक्क बिकीनी घालून आले होते. काहींनी तर बिकीनीवर शोभेल अशा हाय हिल्स सॅण्डलही घातल्या होत्या.

अवघ्या तीन तासामध्ये शेकडो लोकांनी या गॅस स्टेशनवरुन मोफत इंधन भरुन घेतले. यामध्ये पुरुषांची संख्याही मोठी होती. अगदी बिकीनीपासून ते टू पीसपर्यंत अनेक प्रकारचे कपडे घालून पुरुषांनी या गॅस स्टेशनवर हजेरी लावली आणि मोफत इंधनाचा लाभ घेत गाड्यांच्या टाक्या फूल केल्या. तुम्हीच पाहा हे फोटो…





पुरुषांनी या जाहिरातीचा फायदा घेतला असला तरी या गॅस स्टेशनचा हेतू साध्य झाला. कारण याच पुरुषांमुळे हे गॅस स्टेशन जगभरामधील बातम्यांमध्ये झळकले.