scorecardresearch

…जेव्हा सचिन तेंडुलकरनं नाकारली तंबाखूची जाहिरात नी सोडलं पैशावर पाणी

तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहीरातीवरून पुन्हा एकदा दिग्गज अभिनेते आणि खेळाडूंची चर्चा रंगली आहे. अभिनेता अक्षय कुमारनं आपल्या ध्येय धोरणांना तिलांजली देत तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात केली.

Sachin_Tendulkar
…जेव्हा सचिन तेंडुलकरनं नाकारली तंबाखूची जाहिरात नी सोडलं पैशावर पाणी

तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहीरातीवरून पुन्हा एकदा दिग्गज अभिनेते आणि खेळाडूंची चर्चा रंगली आहे. अभिनेता अक्षय कुमारनं आपल्या ध्येय धोरणांना तिलांजली देत तंबाखूजन्य पदार्थाची जाहिरात केली. मात्र आजही काही खेळाडू आणि अभिनेत्यांनी पैशांचा मोह न करता अशा जाहिराती करण्यास नकार दिला आहे. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव आघाडीवर आहे. जगभरातील प्रभावशाली खेळाडूंच्या यादीत सचिन तेंडुलकरचं नाव येतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी सचिनचा मोठा फॅन क्लब आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकर यांची ब्रँड व्हॅल्यू कोणत्याही प्रकारे कमी झालेली नाही. आजही अनेक कंपन्या सचिन यांना ब्रँडशी जोडण्याचा प्रयत्न करत असतात. पण ३२ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात आणि २४ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत सचिनने अशा उत्पादनांची कधीच जाहिरात केली नाही. आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या जाहीराती करण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे.

१९९६ च्या विश्वचषकादरम्यान केवळ तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात होऊ नये, यासाठी सचिन बॅट स्पॉन्सरशिवाय खेळला. तर संघातील इतर खेळाडूंच्या बॅटवर तंबाखू संबंधित ब्रँड्सची जाहिरात दिसली होती. सचिनने कोणत्याही प्रकारचं ब्रँडिंग न करता स्पर्धा खेळली होती. भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेत झालेल्या विश्वचषकादरम्यान विल्स हा तंबाखूजन्य ब्रँड प्रायोजक होता. तर २०१० मध्ये युबी समुहाने त्यांच्या उत्पादनाचे ब्रँडिंग करण्यासाठी सचिनला २० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. पंरतु मास्टर ब्लास्टर सचिनने ती नाकारली. यानंतर महाराष्ट्र सरकारने सचिन यांचं जाहीरपणे कौतुक केलं होतं. तर आयपीएलमध्ये ‘ओ ला ला ला ले ओ’ अशी टॅगलाईन असलेली जाहिरातही सचिनने नाकारली होती. कारण ही कंपनी अल्कोहोल तयार करते. सचिन यांनी अशा जाहिरातींना नकार देण्यामागे वडिलांचा प्रभाव असल्याचं सांगितलं जातं.”सचिन हा क्रिकेट क्षेत्रातील एक दिग्गज खेळाडू आहे. त्याला देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. विशेषत: तरुण त्याच्याकडे आदर्श म्हणून पाहतात तेव्हा जबाबदारी आणखी वाढते. सचिनने त्याच्या कृतीतून हे दाखवून दिलं आहे,” सीओओ आणि फेमस इनोव्हेशन्सचे संस्थापक राज कांबळे यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं.

मी 29 वर्षांचा अनुभव असलेला 20 वर्षांचा तरूण; सचिन तेंडुलकरनं केलं स्वत:चं वर्णन

२०१३ मध्ये सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना वेस्ट इंडिजविरुद्ध मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळला. आजही आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून सचिनचा नावलौकिक आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत २०० कसोटी सामन्यांमध्ये १५९२१ धावा केल्या आहेत. तसेच ४६३ वनडे खेळताना सचिनने १८४२६ धावा केल्या आहेत. सचिनने शेकडो जाहिरातीं केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sachin tendulkar denied to do tobacco and alcohole add rmt

ताज्या बातम्या