Sachin Tendulkar Dance on Naatu Naatu at ISPL T10 : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याची क्रेझ सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. बॉलीवूडमधील खान मंडळी राधिका-अनंत अंबानींच्या प्री-वेडिंग सोहळ्यात राम चरणसह या गाण्यावर नाचताना दिसली; ज्याचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर नाटू नाटू गाण्याची क्रेझ पुन्हा एकदा इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळाली; जिथे खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या गाण्यावर थिरकताना दिसला. सचिनच्या या जबरदस्त डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सध्या ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर ISPL म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सुरू आहे. या लीगच्या उद्घाटन सोहळ्याचे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात चाहत्यांचे लक्ष वेधून घेणारा एक व्हिडीओ आहे; ज्यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरसह राम चरण, बॉलीवूड स्टार्स अक्षय कुमार व क्रिकेटर रवी शास्त्री, सूर्या हे ‘नाटू नाटू’वर नाचताना दिसत आहेत. यावेळी हे सर्व जण नाटू नाटू या गाण्याची हूक स्टेप नाचताना दिसले.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सचिन तेंडुलकर, सूर्या कसे अक्षय कुमार, राम चरण यांच्याबरोबर नाटू नाटू या गाण्यातील हूक स्टेप करीत आहेत. या व्हिडीओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, RRR चित्रपटातील नाटू नाटू गाणे हे केवळ भारतातच नाही, तर जगभरात गाजले. या गाण्याला ‘ऑस्कर’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले, तसेच बेस्ट ओरिजिनल साँग हा पुरस्कारही मिळाला. इतकेच नाही, तर ऑस्करमध्ये चक्क या गाण्यावर परफॉर्मन्सही करण्यात आला होता. एकंदरीत या गाण्याची क्रेझ कमी होताना दिसत नाही.